एचसीएल आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद २०१७ स्पर्धेत अव्वल आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार 

पुणे, २४ मे २०१७: एचसीएल यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या संलग्नतेने आशियाई सर्किटमधील १८ वर्षाखालील गटांतील सर्वात मानाची अशी एचसीएल आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद २०१७ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

आशियांतील बी१ गटातील एकमेव स्पर्धांपैकी एक असलेलली हि स्पर्धा एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे दि २९ मे ते ३ जून २०१७ या कालावधीत रंगणार आहे.

 

स्पर्धेत थायलंड, तैवान, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, मलेशिया, चीन, श्रीलंका, इराण, भारत या ११ देशातील विविध भागातून खेळाडू सहभागी झाले आहेत.

 

एचसीएलच्या माध्यमातून घरच्या मैदानावर भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी स्पर्धा करता यावे, हा यामागचा उद्देश्य आहे. कुमार ग्रँड स्लॅम स्पर्धेनंतर जगातील ही दुसऱ्या क्रमांकाच्या दर्जाची स्पर्धा आहे आणि त्यामुळे भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावरील प्लॅटफॉर्मसह महत्वपूर्ण आयटीएफ गुण मिळवून उपलब्ध करून देण्याबरोबरच आपल्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत आगेकूच करण्याची संधी मिळणार आहे.

 

तसेच, याशिवाय हि स्पर्धा आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), आशियाई टेनिस संघटना(एटीएफ), अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए) आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असून या स्पर्धेत १०० हुन अधिक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू मुले व मुलींच्या एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात सहभागी होणार आहेत.

 

स्पर्धेत प्रत्येक गटात ३२चा ड्रॉ असणार असून यामध्ये अव्वल २२खेळाडूंना(आयटीएफ क्रमवारीच्या आधारावर) मुख्य फेरीत थेट प्रवेश मिळणार असून उर्वरित आणि वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश करणाऱ्या खेळाडूंना पात्रता फेरीत प्रवेश मिळणार आहे. यातील ११ मुली आणि ८ मुलांचा समावेश मुख्य फेरीत असणार आहे.

 

एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले कि, कुमार ग्रँड स्लॅम स्पर्धेनंतर जगातील ही दुसऱ्या क्रमांकाच्या दर्जाची आशियाई कुमार टेनिस स्पर्धा आहे आणि यावर्षी एचसीएलच्या संलग्नतेने भारतात आयोजन करण्यात असल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. याआधीच्या मालिकेतदेखील देशभरातून या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला आहे आणि यावर्षीदेखील ११देशांतून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होत आहे हे पाहून आम्ही भारावून गेलो आहोत.

 

याविषयी बोलताना एचसीएल कॉर्पोरेशन आणि शिव नादर फाऊंडेशनचे धोरण व्यवस्थापकीय सुंदर महालिंगम म्हणाले कि, आमच्या क्रीडाविषयक उपक्रमांच्या माध्यमातून खेळाडूंना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांनी कारकीर्द समृद्ध करण्याचे तत्वज्ञान एचसीएलने ठेवले आहे,. याआधी एचसीएलने सब-जुनिअर गटात राष्ट्रीय स्तरावर प्लॅटफॉर्म उपलब्ध केले असून यावर्षी आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे भारतात आयोजन करण्यात आले असून हि स्पर्धा अतिशय प्रतिष्ठेची अशी स्पर्धा आहे.

 

आशियाई कुमार टेनिस स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय खेळाडूंना अव्वल दर्जाच्या आंतराराष्ट्रीय खेळाडूंशी स्पर्धा करण्यासाठी आणि आपल्या खेळाचा दर्जा सुधारविण्याची संधी मिळणार आहे.

 

स्पर्धेसाठी कौस्तुभ शहा यांची स्पर्धा संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. २०१६ मध्ये आशियाई कुमार टेनिस स्पर्धेत जपानच्या नाओकी ताजीमा(जागतिक क्र.२८) आणि चीनच्या झियु वांग(जागतिक क्र.१३)यांनी विजेतेपद पटकावले होते.