मोसमातील पहिल्याच स्पर्धेतून राफेल नदालची माघार

ब्रिस्बेन । स्पेनच्या राफेल नदालने ऑस्ट्रेलियामध्ये होत असलेल्या ब्रिस्बेन ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याने याची अधिकृत घोषणा ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

एटीपी २५० प्रकारातील ही स्पर्धा असून खेळाडू याकडे ऑस्ट्रेलियन ओपनच्या तयारीच्या दृष्टीने पाहतात. पुण्यातील महाराष्ट्र ओपन, कतारमधील दोहा ओपन आणि ऑस्ट्रियामधील ब्रिस्बेन ओपनने टेनिस हंगामाची सुरुवात होते. यात मोठे खेळाडू भाग घेतात.

नदालने ब्रिस्बेन ओपनमधून माघार घेतल्यामुळे टेनिस प्रेमींची निराशा झाली आहे.

“मला कळविण्यास वाईट वाटत आहे की ब्रिस्बेन ओपनमध्ये यावर्षी भाग घेत नाही. मला ही स्पर्धा खेळायची होती परंतु मला गेल्या मोसमातील दीर्घ खेळण्यामुळे आणि उशिरा सुरु केलेल्या तयारीमुळे माघार घ्यावी लागत आहे. ही एक चांगली स्पर्धा आहे आणि मी येथे यापूर्वी चांगली कामगिरी केली आहे. ” असे नदाल म्हणाला.

“मी माझ्या ऑस्ट्रेलियन चाहत्यांना ४ जानेवारी रोजी भेटणार आहे. मेलबर्न येथे मी ऑस्ट्रेलियन ओपनचा तेव्हा सराव सुरु करणार आहे. ” असेही तो पुढे म्हणाला.