प्रीमियर लीग: लीव्हरपूलची विजयी घोडदौड सुरूच

आज प्रीमियर लीगमध्ये लीव्हरपूलने टोटेनहॅम हॉटस्परचा 2-1 असा पराभव करत लीगमधील सलग पाचवा विजय नोंदवला आहे.

या दोन क्लबमध्ये झालेल्या सामन्यात एकूण 149 गोल झाले होते. तर आज लीव्हरपूलकडून जॉर्जिनीयो वेनाल्डमने 39व्या मिनिटाला 150वा आणि सामन्यातील पहिला गोल केला. यामुळे लीव्हरपूल पहिल्या सत्रात 1-0असा आघाडीवर होता.

दुसऱ्या सत्रात लीव्हरपूलने आक्रमक सुरूवात केली. स्ट्रायकर रोबेर्तो फिरमिनोने 54व्या मिनिटाला गोल करत लीव्हरपूलला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

लीव्हरपूलने पहिल्यांदाच या लीगचे पहिले पाचही सामने जिंकले आहेत. तसेच क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. तर टोटेनहॅम सलग दुसऱ्या सामन्यात पराभूत झाला आहे. 2015-16च्या हंगामानंतर प्रथमच टोटेनहॅमच्या बाबतीत असे घडले आहे.

टोटेनहॅमच्या एरिक लॅमेलाने क्लबसाठी 93व्या मिनिटाला गोल करत सामना 1-2 असा केला. पण तरीही लीव्हरपूलला पुर्ण तीन गुण मिळाले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

भारताच्या या हॉकीपटूचे नाव आढळले नाडाच्या यादीत

एशिया कप २०१८: भारतीय संघाच्या मदतीसाठी दुबईला जाणार हे गोलंदाज