आता येणार ‘रीट्रॅकएबल’ फुटबॉल पीच

प्रसिद्ध फुटबॉल क्लब टॉटेनहॅम हॉट्सपर यांनी क्रीडारसिकांसाठी एक लक्षणीय गोष्ट तयार केली आहे. त्यांचे नवीन स्टेडियम हे जगातील पहिलं रीट्रॅकएबल स्टेडियम असणार आहे.

रीट्रॅकएबल म्हणजे मागे ओढून घेणे, ज्यामुळे आहे त्या मैदानाचे रूपांतर एका नवीन मैदानात होते व वेगळा खेळ देखील खेळता येतो. अशी भन्नाट कल्पना हॉट्सपर क्लबने नुकतीच राबवली आहे. या नवीन मैदानाचे काम जोरात सुरु आहे. या मैदानावर एकाच वेळी दोन खेळ खेळता येणार आहेत. फुटबॉल (सॉकर) आणि अमेरिकन फुटबॉल हे खेळ या मैदानावर आंतराष्ट्रीय पातळीवर खेळवले जाऊ शकतात.

सॉकरचे मैदान वर असेल तर त्याच्या खाली अमेरिकन फुटबॉलचे मैदान असेल. ‘स्लायडिंग पीचच्या’ साह्याने सॉकरचे मैदान अमेरिकन फुटबॉलमध्ये बदलण्यात येईल. मैदान बदलायला तब्बल २५ मिनिटांचा कालावधी अपेक्षित आहे.

ज्या कंपनीने विम्बल्डच्या सेन्टर कोर्टचे रीट्रॅकएबल रूफ तयार केले होते त्याच कंपनीकडे हे काम सोपवण्यात आले आहे. एससीएक्स असे त्या कंपनीचे नाव आहे.