पहिल्या दिवसाच्या त्या घटनेमुळे संपुर्ण ऑस्ट्रेलिया संघ झाला नाराज

मेलबर्न। आजपासून(26 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 89 षटकात 2 बाद 215 धावा केल्या आहेत.

भारताकडून पहिल्या दिवसाखेर चेतेश्वर पुजारा 200 चेंडूत 68 धावांवर आणि कर्णधार विराट कोहली 107 चेंडूत 47 धावांवर नाबाद खेळत आहेत.

या संपुर्ण दिवसात सर्वाधिक चर्चा जर कसली झाली असेल तर ती आहे मिचेल स्टार्कने टाकलेल्या सामन्यातील ८७व्या षटकाची.

या षटकात स्टार्क सतत १४० पेक्षा ताशी किलोमीटरच्या वेगाने गोलंदाजी करत होता. यातील दुसऱ्या चेंडूवर कोहलीच्या बॅटची कड घेत चेंडू यष्टीरक्षक टीम पेनकडे गेला. परंतु हा झेल त्याला घेता आला नाही. यामुळे दिवसातील जेमतेम २ षटकं बाकी असताना विराट बाद होण्यापासून वाचला. तसेच संपुर्ण दिवसात ऑस्ट्रेलियाला केवळ २ विकेट्स मिळाल्या.

“स्टार्कने दिवसातील सर्वोत्तम षटक टाकले होते. त्याने कोहलीला आत आणि बाहेर जाणारे चेंडू टाकून चांगलाच त्रास दिला होता. आशा आहे की नवीन चेंडू उद्या सकाळीही अशेच काम करेल. कोहलीला बाद करण्याची संधी गमावणे नक्कीच निराशाजनक गोष्ट आहे. ” असे दिवसातील खेळानंतर ट्रॅविस हेड म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या:

८६ वर्षांत कोणत्याही भारतीयला न जमलेली गोष्ट मयांक अगरवालने पदार्पणातच केली

जेव्हा खेळाडू नाही तर प्रेक्षकच करतात कसोटी सामन्यात विक्रम

मयंक अगरवाल असा पराक्रम करणारा केवळ पाचवा भारतीय सलामीवीर फलंदाज