ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी मुलांना सांगणार व्यायामाचे महत्त्व

हनुमान जयंतीनिमित्त पेशवेकालीन गराडे तालमीत उपक्रम

पुणे : मोबाईस गेम्सच्या अधीन झालेल्या आजच्या मुलांना व्यायामाची प्रेरणा मिळावी आणि महाराष्ट्राच्या लाल मातीतील कुस्तीची ओळख व्हावी, यासाठी हनुमान जयंतीचे औचित्य साधून १६५ वर्षे जुन्या पेशवेकालीन गराडे तालमीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकविणारा विजय चौधरी मुलांशी संवाद साधणार आहे.

*ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी मुलांना सांगणार व्यायामाचे महत्त्व

* आयोजक: साईनाथ मंडळ ट्रस्ट

*उपस्थिती : महाराष्ट्र केसरी विजय चौधरी

* दिनांक : ११ एप्रिल २०१७, मंगळवार

* वेळ: सायंकाळी ४ वाजता.

* स्थळ: गराडे तालीम, पासोड्या विठोबा मंदिर जवळ, बुधवार पेठ, पुणे