हा ठरला श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यातील निर्णायक क्षण !

आज श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे कसोटी सामन्याचा अंतिम दिवस होता. सकाळी सामना चालू झाला तेव्हा सर्वांनाच असे वाटले की, झिम्बाब्वे हा सामना जिकून कसोटी क्रिकेटमध्ये आपला पहिला विजय मिळवणार. पण श्रीलंकेच्या फलंदाजांनी चिकाटीचा खेळ करून सामना जिंकला आणि एकदिवसीय मालिकेमधील पराभवाचा बदला घेतला. पण फक्त श्रीलंकेच्या फलंदाजांमुळेच हा विजय शक्य झाला असे नाही तर पंचांची ही साथ त्याना लाभली.

श्रीलंकेच्या फलंदाजीच्या ६९व्या षटकात तिसऱ्या पंचानी एक धक्कादायक निर्णय दिला.

सिकंदर रझा निरोशन डीकवेलला ३७ धावांवर असताना त्याला गोलंदाजी करीत होता. त्यानंतर त्याने पार्कच्या सभोवताली रझाच्या गोलंदाजीवर फटकेबाजी केली आणि निरोशनने पहिल्या तीन चेंडूंवर आठ धावा काढल्या. चौथ्या चेंडूवर रझाने त्याला चकवले आणि मग यष्टीरक्षक रेगिंस चाकबवायाने लगेचच त्याला यष्टिचित केले, निरोशन बाद आहे का नाही हे पाहण्यासाठी मैदानावरील पंचानी तिसऱ्या पंचांच्या हाती निर्णय सोपविला. मोठ्या स्क्रीनवर असे दिसून आले की डिकवेलचा पाय लाईनवर होता, पण नियमाप्रमाणे तो लाईनच्या मागे हवा होता.

तिसऱ्या पंचानी सर्व कोनातून बघितले पण डिकवेलाच पाय लाईनच्या मागे नव्हता, तरी सुद्धा ‘बेनिफिट ऑफ डाउट’ च्या आधारे त्याला बाद देण्यात आले नाही. त्यानंतर त्याने ८१ धावा करून श्रीलंकेच्या विजयामध्ये हातभार लावला.

लान्स क्लुजनर जे की झिम्बाब्वे चे फलंदाजी प्रशिक्षक आहेत त्यांनी तर तिसऱ्या पंचानी निर्णय देण्याच्या आधीच आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली होती पण पंचांचा निर्णय काही औरच आला. मुख्य प्रशिक्षक हिथ स्ट्रीक यांनी लगेच त्यांची निराशा दाखवून दिली.

या सामन्याचा मानकरी रंगाना हेराथ ठरला. त्याने सामन्यात ११ बळी घेतले. झिम्बाब्वेने श्रीलंकेला एकदिवसीय मालिकेत ३-२ असे पराभूत केले आहे. श्रीलंकेने जरी हा कसोटी सामना जिंकला असला तरी झिम्बाब्वे सारख्या दुबळ्या संघाने असा लढवय्या खेळ करणे हे कसोटी क्रिकेटसाठी चांगले आहे.