पुरूषांच्या सामन्यात महिला फोटोग्राफरला नाकारला प्रवेश, थेट इमारतीच्या छतावरुन केले फोटोशूट

इरानमध्ये एका महिला फोटोग्राफरला स्टेडियममध्ये प्रवेश नाकारला. लिंगभेदावरून परीसा पौरताहेरीयनला प्रवेश न मिळाल्याने इरानच्या या महिलेने एका इमारतीवरून यावेळी फोटोग्राफी केली.

क्वेमशहर येथील वतानी स्टेडियममध्ये पुरूषांमध्ये सुरू असणाऱ्या फुटबॉल सामन्यादरम्यान ही घटना घडली.

ट्विटरवर तिचे हे इमारतीवरून फोटोग्राफी करणारे फोटोज चांगलेच व्हायरल झाले आहेत. तेहरान विद्यापीठाची विद्यार्थीनी असलेसी परीसा हि एफसीकेआयए अकादमी आणि इरान व्हॉलीबॉल फेडरेशनसाठी फोटोग्राफर म्हणून काम करते.

यावेळी परीसाला फक्त पहिल्या सत्राचेच फोटो काढता आले. तिच्या या जिद्दीचे लोकांनी ट्विटरवर खूप कौतुक केले.

इरानमध्ये फुटबॉल आणि व्हॉलीबॉल हे खेळ लोकप्रिय आहेत. या सामन्यामध्ये महिलांना प्रवेश नसल्याने तरीही ते सामने बघण्याचा प्रयत्न करतात.

मे महिन्यातच तेहरीनमधील आझादी स्टेडियमवरील काही महिलांचे पुरूषांचे कपड्यांतील फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.

२०१८च्या फिफा विश्वचषकातील इरान विरुद्ध स्पेनचा सामना आझादी स्टेडियमवर दाखवला  होता. यावेळी पहिल्यांदा महिलांना प्रवेश दिला होता. आतापर्यंत तेथील महिलांनी एकही सामना प्रत्यक्ष मैदानात जाऊन बघितलेला नाही.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

लॉर्ड्सवरील आॅनर्स बोर्डवर स्थान मिळवण्यासाठी एवढी मोठी कामगिरी करावी लागते

दक्षिण आफ्रिकेचा हा खेळाडू म्हणतो ‘यारों का कोई ठिकाना नहीं होता’