रोहित शर्माचे ट्विटरवर दिग्गजांकडून जोरदार कौतुक

मोहाली । श्रीलंका संघाविरुद्ध दुसऱ्या वनडेत रोहित शर्माने द्विशतकी खेळी केली. त्याचे हे वनडेतील तिसरे द्विशतक होते. या खेळीत त्याने तब्बल १२ षटकार खेचले.

त्याने २०१७या वर्षात २० वनडेत फलंदाजी करताना ७५.६४च्या सरासरीने १२८६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४५ षटकारांचा आणि ११६ चौकरांचा समावेश आहे.

त्याच्या ह्या खेळीवर दिग्गजांनी या खेळाडूचे जोरदार कौतुक केले आहे. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, सुरेश रैना, डीन जोन्स, अमित मिश्रा, अझहर मेहमूद, हर्षल गिब्स यांचा समावेश आहे.