महाराष्ट्राच्या कबड्डी संघावर कौतुकाचा वर्षाव

हैद्राबाद । काल तब्बल ११ वर्षांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजतेपद जिंकलेल्या कर्णधार रिशांक देवाडिगाच्या संघावर जोरदार कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गजानन कीर्तिकर यांच्यापासून ते अनेक कबड्डीप्रेमींनी सोशल माध्यमांवरून संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून संघाला खास शुभेच्छा दिल्या. ” हैद्राबादवरून महाराष्ट्रासाठी गोड बातमी आहे. महाराष्ट्राच्या संघाने ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद तब्बल ११ वर्षांनी मिळवले आहे. रिशांक देवाडिगा आणि त्याच्या संघांचे अभिनंदन. आम्हाला तुमचा अभिमान आहे. चांगलं काम सुरु ठेवा. ” असे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात.

खासदार गजानन कीर्तिकर यांनी दिल्या अशा शुभेच्छा.
महाराष्ट्र संघाने ‘वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धे’चे विजेतेपद पटकावले. या विजेतेपदात महाराष्ट्राच्या संपूर्ण संघाने एकजूट होऊन विजयश्री खेचून आणली आहे. महाराष्ट्रातील तरुण कबड्डीपटूंना हा विजय प्रेरणादायी ठरणारा असून या विजेत्या संघाचे पुन्हा एकदा अभिनंदन!