ट्विटरवर हाशिम आमलाचा बोलबाला…

नेहमी एक कसोटीपटू म्हणून पहिल्या गेलेल्या हाशिम आमलाने ह्या आयपीएलमध्ये गेल्या ५ डावात चक्क २ शतकं केली आहेत. आज आमला वादळाचा जोरदार तडाखा गुजरात लायन्स संघाला बसला. ६० चेंडूत १०४ धावांची तडाखेबंद खेळी करताना आमलाने ५ षटकार आणि ८ चौकार मारले. २० एप्रिल रोजी मुंबई विरुद्ध खेळतानाही आमलाने ६० चेंडूत १०४ धावा केल्या होत्या.

साहजिकच या ३४ वर्षीय खेळाडूवर क्रिकेट चाहत्यांच्या शुभेच्छांचा पाऊस ट्विटरवर पडला. त्यातील काही निवडक ट्विट्स: