ट्विटरवर आयपीएल प्रसारण हक्काचा बोलबाला !

मुंबई | इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल प्रक्षेपणाचे हक्क ‘स्टार इंडिया’ कंपनीला मिळाले आहे. अनेक मोठ्या कंपन्या यासाठी लिलावात असताना ‘स्टार इंडिया’ने तब्बल १६ हजार ३४७ कोटी रुपयांची बोली लावत प्रक्षेपणाचे हक्क मिळवले आहे.हे हक्क २०१८ ते २०२२ या पाच वर्षासाठी असून प्रत्येक वर्षाला बीसीसीआयला ३ हजार २६९ कोटी मिळणार आहे. या लिलावातून बोर्डाला अंदाजे २० हजार कोटी रुपये मिळण्याचा अंदाज होता.

आज ही बातमी वाऱ्या सारखी पसरली आणि काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाली. ट्विटरवर तर लगेचच #IPLMediaRights असा हॅश टॅगही ट्रेंडिंग झाला. अनेक जेष्ठ क्रीडापत्रकारांबरोबर, उद्योगपती, खेळाडू आणि चाहत्यांनी ट्विटरवर अनेक गमतीशीर ट्विट केले. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी तर या लिलावाच्या रकमेची तुलना भूतान आणि मालदीवच्या जिडीपीशी केली.

https://twitter.com/IPL/status/904620781354631168