ट्विटरवर आशिष नेहराची चेष्टा !

ऑस्ट्रेलियासाठीच्या टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर झाला. या संघात दिनेश कार्तिक आणि अनुभवी गोलंदाज आशिष नेहराला संधी देण्यात आली आहे. देशातील सर्व क्रिकेट प्रेमींचे डोळे हा निवड समितीचा निर्णय बघून उंचावले. एवढेच नाही तर काहींनी तर सोशल मीडियावर नेहराला ट्रोल करायला ही सुरवात केली.

आशिष नेहरा हा भारताच्या या टी-२० संघातील सर्वात आधी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला खेळाडू आहे. नेहराने १९९९ मध्ये आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना कर्णधार महंमद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली खेळला होता आणि आता तो विराट कोहलीच्या नेतृत्वा खाली खेळणार आहे जो की त्याच्या नंतर १० वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला आहे.

भारताच्या संघात आता जगातील सर्वोत्तम युवा वेगवान गोलंदाज आहेत. टी-२० चा पुढील विश्वचषक २०२०मध्ये आहे. नेहराचे वय आता ३८ आहे, २०२० च्या विश्वचषकापर्यंत तो खेळणार आहे का नाही ? जर तो खेळला नाही तर त्याला आता संधी देण्यात काय अर्थ असे अनेक प्रश्न देशातील क्रिकेट प्रेमींना पडले.

याच कारणामुळे ट्विटरकरांनी नेहराची चेष्टा चालू केली.