टी ब्रेक झालायं, शास्त्रींना झोपेतून उठवा- चाहत्यांचा हल्लाबोल

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचे प्रशिक्षक रवि शास्त्रींच्या एका कृतीने नेटकरांच्या हाती त्यांना ट्रोल करण्यासाठी आयतं कोलीत मिळालं आहे.

किस्सा असा आहे की, या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग समालोचन करताना त्याने भारताचे प्रशिक्षक रवि शास्त्री ड्रेसिंग रुमध्ये खुर्चीवर बसून झोपत असल्याचे पाहिले आणि शास्त्रींच्या शेजारी बसलेल्या सहाय्यक प्रशिक्ष संजय बांगर यांना हरभजनने उठवण्याtचा निरोप दिला.

जेव्हा संजय बांगर यांनी शास्त्रींना हरभजनचा निरोप दिला तेव्हा रवि शास्त्रींनी ते झोपले नव्हते तर ध्यान( मेडिटीएशन) करत होते असे इशाऱ्याने सांगितले.

याप्रकरणानंतर भारताचे प्रशिक्षक रवि शास्त्रींची नेटकऱ्यांनी जोरदार खिल्ली उडवली. यामध्ये एकाने गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या योयो टेस्टचा प्रशिक्षकांच्या निवडीसाठीही अवलंब करावा असे ट्विट केले आहे.

 

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

-कोहलीचा असाही एक विक्रम, ज्यासाठी सचिन, द्रविडला खेळावे लागले १० सामने जास्त

-सचिन-कांबळी जोडीची करामत, गांगुलीच्या रुममध्ये झाले पाणीच पाणी…