विराट कोहलीच्या टीम इंडियाबद्दल केलेले हे वक्तव्य रवी शास्त्रींना भोवले

इंग्लंड विरुद्ध भारत संघात 7 सप्टेंबर पासून पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना होणार आहे. या सामन्याआधी बुधवारी (5 सप्टेंबर) पत्रकारांशी भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी संवाद साधला.

या संवादादरम्यान ते सध्याच्या भारतीय संघाविषयी बोलताना म्हणाले, “मागील तीन वर्षांत आम्ही परदेशात 9 कसोटी सामने आणि तीन मालिका जिंकल्या आहेत. मागील 15-20 वर्षांत कोणत्याही भारतीय संघाला असे कमी वेळात यश मिळालेले मी पाहिले नाही आणि त्या मालिकांमध्ये तर दिग्गज खेळाडू होते.”

शास्त्रींच्या या वक्तव्यावर मात्र चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काही चाहत्यांनी शास्त्रींना भारताच्या प्रशिक्षक पदावरुन हटवण्यासही बीसीसीआयला सुचवले आहे.

शास्त्रींनी सांगितल्याप्रमाणे भारतीय संघाने मागील तीन वर्षात परदेशात खेळताना श्रीलंकेविरुद्ध 2 मालिका आणि विंडिज विरुद्ध 1 मालिका अशा 3 मालिका जिंकल्या आहेत.

तसेच भारताने परदेशातील 9 सामन्यातील विजयांपैकी 5 विजय श्रीलंका विरुद्ध, 2 विजय विंडिज विरुद्ध तर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विरुद्ध प्रत्येकी एक विजय मिळवला आहे.

तसेच शास्त्री हे भारताच्या सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि एमएस धोनी अशा माजी दिग्गज कर्णधारांच्या यशाकडे दुर्लक्ष करत असल्याचीही टीका अनेक चाहत्यांनी केली आहे.

भारत-इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत 1-3 असा पिछाडीवर आहे. या मालिकेतील भारताच्या कामगिरीबद्दल अनेक दिग्गजांनी टीका केली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

शुटींग वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये १६ वर्षीय सौरभ चौधरीचा सुवर्णवेध

भारत विरुद्ध विंडिज संघात लखनऊमध्ये होणारा टी20 सामना या कारणामुळे ठरणार खास

ब्राझिलचा रोनाल्डो बनला ला लीगामधील या क्लबचा मालक