चहलला पाहताच मॅक्सवेलला झाली नाटकी नेमारची आठवण!

नॉटिंगहॅम। गुरुवारी 12 जुलैला भारताने इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्याच्या पहिल्या डावात भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलबाबतीत एक मजेशीर किस्सा घडला. चहल इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सला गोलंदाजी करत होता, त्यावेळी स्टोक्सने मिडविकेटला चेंडू टोलवला.

यावेळी हार्दिक पंड्याने क्षेत्ररक्षण करताना फेकलेला चेंडू थेट चहलच्या उजव्या गुडघ्याला लागला. त्याक्षणी चहल मैदानात वेदनेने लोळायला लागला.

त्याचा हा व्हिडिओ आॅस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आणि त्याला ‘नेमार’ असे कॅप्शन दिले.

रशियात चालू असलेल्या फिफा विश्वचषकात वेदनेचे नाटक करत लोळल्यामुळे नेमारला प्रचंड प्रमाणात ट्रोल केले गेले आहे. त्यामुळे मॅक्सवेलनेही गमतीने चहलचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामला शेअर करत नेमारची आठवण करुन दिली आहे.

चहलच्या या व्हिडिओवर चाहत्यांनीही अनेक पोस्ट केल्या आहेत.

गुरुवारी झालेल्या या सामन्यात चहलने 1 विकेट घेतली आहे. तसेच कुलदिप यादवने 6 विकेट घेत आणि रोहित शर्माने 6 विकेट घेत भारताच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

-फेडररला पराभूत करणारा खेळाडूला एबी डिव्हीलियर्सने केले होते टेनिसमध्ये पराभूत

-भारताचा महान फलंदाज मोहम्मद कैफ सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त

-भारतीय हौशी कबड्डी महासंघाचा(AKFI) सावळा गोंधळ