आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ट्विटरची खास ईमोजी

आयपीएल २०१७ मध्ये ट्विटर ईमोजी मोठ्या प्रमाणावर ट्विपलमध्ये हिट ठरल्यानंतर ट्विटरने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खास ईमोजी बनवली आहे.
याबद्दलची अधिकृत पोस्ट काल आयसीसीच्या तसेच ट्विटर इंडियाच्या अकाउंटवरून प्रसिद्ध करण्यात आली. यात तुम्ही ट्विटरवर #CT17 असं लिहिल्यास ही ईमोजी तयार होते. ही ईमोजी हुबेहूब चॅम्पियन्स ट्रॉफीसारखीच दिसते.

आज अर्थात १ जून पासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत असल्यामुळे ट्विटरने ही खास ईमोजी प्रसिद्ध केली आहे.

आयपीएल २०१७ साठी २०हुन अधिक ईमोजी बनवूनही त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. यामुळे ट्विटरने आयपीएल २०१७ चा ट्विटरचा ड्रीम संघही घोषित केला होता. यावेळी ही एकच ईमोजी ट्विटरने बनवली असल्याकारणाने तिला किती प्रतिसाद मिळतो हे पुढील येत्या १८ दिवसात समजेलच.