हैद्राबाद कसोटीसाठी मयांक अगरवालला संधी न दिल्याने टीम इंडियावर उठली टीकेची झोड

हैद्राबाद। भारत विरुद्ध विंडीज संघात उद्यापासून (12 आॅक्टोबर) दुसरा कसोटी सामना सुरु होत आहे. या सामन्यासाठी भारताच्या अंतिम 12 खेळाडूंची नावे जाहिर करण्यात आली आहेत.

या सामन्यासाठी पहिल्या कसोटीत खेळवलेला 12 जणांचा संघच कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मयंक अगरवाल आणि मोहम्मद सिराज यांना कसोटी पदार्पणासाठी वाट पहावी लागणार आहे.

अंतिम 12 खेळाडूंच्या या संघात विराट कोहली, केएल राहुल, पृथ्वी शाॅ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे.

यात वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला 12 वा खेळाडू म्हणुन स्थान देण्यात आले आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघात मयंक अरवालला संधी दिली जाईल अशी चर्चा होती. पण आज घोषित झालेल्या अंतिम 12 जणांच्या भारतीय संघात त्याला स्थान देण्यात आले नसल्याने भारतीय संघ व्यवस्थापनेवर टीकेची झोड उठली आहे.

तसेच आॅस्ट्रेलिया दौऱ्याआधी होत असलेली ही विंडीज विरुद्धची मालिका महत्त्वाची मानली जात होती. त्यामुळे भारतीय संघाच्या टीकेमध्ये आणखी भर पडली आहे.

अशी आहे मयंकची कामगिरी-

मयंक हा मागील काही महिन्यांपासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. 2017-18 च्या रणजी ट्रॉफी मोसमातही तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने या मोसमात 13 डावात 105.45 च्या सरासरीने 1160 धावा केल्या होत्या.

त्यानंतर याच मोसमात त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याने 8 डावात 723 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर त्याची यावर्षी जून जुलै महिन्यात भारतीय संघाने केलेल्या इंग्लंड दौऱ्यातही निवड झाली होती.

यात त्याने तीन शतके आणि एक अर्धशतकासह 8 सामन्यात 56.77 च्या सरासरीने 511 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या चौरंगी मालिकेतही भारत ब संघाकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली होती.

तसेच सध्या सुरु असणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतही विंडीजविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याने चांगली कामगिरी केली होती. त्याचबरोबर विंडिजविरुद्ध सराव सामन्यातही त्याने 90 धावा केल्या होत्या.

त्याची ही कामगिरी पाहता त्याची भारतीय संघातील त्याचे पदार्पण जवळ जवळ नक्की मानले जात होते, परंतू त्याला भारताच्या संघात संधी देण्यात आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या-