…म्हणून ट्विटरवरुन होत आहे भारतीय संघ व्यवस्थापनेवर टीका

मँचेस्टर। आज(9 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिला उपांत्य सामना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरु आहे. मात्र या सामन्यासाठी भारताच्या 11 जणांच्या संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संधी मिळालेली नाही. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनेवर सोशल मीडियातून टीका होत आहे.

शमीने या विश्वचषकात भारताकडून 4 सामने खेळताना 14 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये एका हॅट्रिकचाही समावेश आहे. तसेच तो भारताकडून या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे.

मात्र आज भारताने गोलंदाजीच्या फळीत भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांना, तसेच रविंद्र जडेजा आणि युजवेंद्र चहलला फिरकी गोलंदाज म्हणून संधी दिली आहे.

शमीला याआधीही 6 जूलैला श्रीलंका विरुद्धच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यासाठी विश्रांती दिल्याचे सांगत 11 जणांच्या संघात संधी दिली नव्हती. पण आज त्याला उपांत्य सामन्यासारख्या मोठ्या सामन्यात संधी मिळेल अशी अनेकांनी आपेक्षा केली होती.

पंरतू त्याचा न्यूझीलंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यासाठी संघात समावेश न करण्यात आल्याने सौरव गांगुली, हर्षा भोगले, आकाश चोप्रा अशा दिग्गजांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याचबरोबर क्रिकेट चाहत्यांनाही शमीला संधी न दिल्याने ट्विटरवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना 46.1 षटकात 5 बाद 211 धावांवर थांबला आहे. हा उर्वरित सामना उद्या(10 जूलै) राखीव दिवस असल्याने उद्या भारतीय प्रमाणवेळे नुसार दुपारी 3 वाजता सुरु होईल.

तसेच हा सामना जिथे थांबला त्या धावसंख्येवरुनच उद्या सुरु होईल. हा सामना कोणत्याही व्यत्ययामुळे उद्याही पूर्ण झाला नाही, तर भारतीय संघ साखळी फेरीनंतर गुणतालिकेत न्यूझीलंडपेक्षा वरच्या स्थानावर असल्याने थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताविरुद्ध अर्धशतकी खेळीबरोबरच कर्णधार विलियम्सनने केली एका विश्वविक्रमाची बरोबरी

११ वर्षांनंतर रविंद्र जडेजाच्या बाबतीत झाला हा खास योगायोग

असा पराक्रम करणारा एमएस धोनी दुसराच यष्टीरक्षक