- Advertisement -

चूक केली एकाने शिक्षा मात्र दुसऱ्याला!

0 467

दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडलेली तिसरी कसोटी चेंडू छेडछाड प्रकरणामुळे चांगलीच गाजली आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेल्या या लाजिरवाण्या प्रकारामुळे त्यांच्यावर सर्वच स्थरातून टीका होत आहेत.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथनेही ऑस्ट्रेलियाकडून चेंडू छेडछाडीचा प्रकार झाला असल्याचे काल पत्रकार परिषदेत मान्य केले होते. तसेच ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज कॅमेरॉन बॅनक्रोफ्टही मैदानात प्रत्यक्ष कृती करताना कॅमेरामध्ये कैद झाला होता.

या सगळ्या प्रकारामुळे स्मिथला कर्णधार पदावरूनही पायउतार व्हावे लागले आहे. तसेच त्याला सर्वांनीच चेंडू छेडछाडीच्या गैरप्रकारामुळे लक्ष्य केले आहे. पण या सगळ्यात गंमत अशी कि ट्विटरवर स्टीव्ह स्मिथ या खेळाडूला टॅग करण्याऐवजी लोकांनी दुसऱ्याच एका स्टीव्ह स्मिथला टॅग केले आहे.

म्हणजेच ट्विटमध्ये @stevesmith49 असे टॅग करण्याऐवजी @stevesmithffx असे टॅग करण्यात आले आहे. @stevesmith49 हे क्रिकेटपटू स्मिथचे युझरनेम आहे तर @stevesmithffx हे दुसऱ्याच स्मिथचे युझरनेम आहे.

दोघांचीही नावे सारखी असल्याने आणि विशेष म्हणजे दोघांचेही ट्विटर अकाउंट वेरिफाइड असल्याने लोकांचा अजून गोंधळ उडाला आहे. या गोंधळामुळे मात्र हा दुसरा स्मिथ बेजार झाला आहे. पण त्याचबरोबर त्याने या सगळ्या गोष्टीची मजा देखील घेतली आहे.

त्याने त्याला आलेले ट्विटचे फोटो शेयर केले आहेत ज्यात स्टीव्ह स्मिथ या खेळाडूला टॅग करण्याऐवजी दुसऱ्या स्मिथला टॅग करण्यात आले आहे.

 

Comments
Loading...
%d bloggers like this: