….केएल राहुलच्या जागी पृथ्वी शाॅला टीम इंडियात संधी द्या!!!

भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना उद्यापासून (३० आॅगस्टपासून ) सुरु होत आहे. भारत या मालिकेत १-२ असा पिछाडीवर आहे. परंतु तिसरा सामना जिंकून भारताने मालिकेत चांगली वापसी केलेली आहे.

चौथ्या आणि पाचव्या कसोटीसाठी संघनिवड झाली तेव्हा मुरली विजय आणि कुलदीप यादव या दोन खेळाडूंना संघातून वगळण्यात आले होते तर पृथ्वी शाॅ आणि हनुमा विहारीला संधी देण्यात आली.

परंतु संघव्यवस्थापन जवळपास तिसऱ्या कसोटीतील विजयी संघच कायम ठेवले.

याचमुळे सध्या धावा जमविण्यासाठी धडपडत असलेल्या भारतीय सलामीवीरांऐवजी १८ वर्षीय पृथ्वी शाॅला संघात संधी द्यावी असे ट्विट अनेक चाहते करत आहेत.

शिखर धवनने ४ डावात ११८, मुरली विजयने ४ डावात २६ तर केएल राहुने ६ डावात ९४ धावा केल्या आहेत.

गेल्या सामन्यात दिनेश कार्तिक ऐवजी संधी दिलेल्या रिषभ पंतने चांगली कामगिरी केली. यामुळे त्याच्याप्रमाणेच पृथ्वी शाॅलाच संधी द्यावी असे मत काही नेटिझन्सने व्यक्त केले आहे.

तसेच शाॅ गेले काही महिने इंग्लंडमध्ये असुन त्याने येथे चांगली कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 एशियन गेम्स: भारताला मिश्र रिलेत ऐतिहासिक रौप्यपदक

 …तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता!!!

भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीत या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष…

 आफ्रिदीला ‘बूम-बूम’ हे फेमस टोपण नाव देणारा कोण होता तो भारतीय खेळाडू

लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे

-कोहली आता तरी तो ‘नकोसा’ विक्रम टाळणार का?

-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड

-एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक

-भारतीय संघासाठी ही आहे दिवसातील सर्वात मोठी गोड बातमी