२४ तासात जागतिक क्रिकेटमध्ये २ खळबळजनक विजय

गेले २४ तास हे जागतिक क्रिकेटमध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाणार आहे. कसोटी क्रमवारीत ८व्या आणि ९व्या स्थानावर असणाऱ्या संघांनी अनुक्रमे ३ऱ्या
आणि ४थ्या स्थानावर असणाऱ्या संघांना धूळ चारली.

ही कामगिरी यासाठी मोठी आहे कारण यातील विंडीज संघ हा एक अतिशय दुबळा संघ म्हणून त्याकडे पहिले जाते. तर जगात जे दिग्गज संघ आहेत त्यात बांगलादेशला स्थान मिळालेले नाही.

विंडीज विरुद्ध इंग्लंड
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या इंग्लंड संघाला त्यांच्याच घराच्या मैदानावर पराभूत करण्याचा करिष्मा विंडीज संघाने केला आहे. १ जानेवारी २००१ व नंतर या संघाने आजपर्यत १७१ कसोटी सामने खेळले असून त्यात तब्बल ९१ पराभव पहिले आहेत. त्यातील ३३ विजय हे झिम्बाब्वे आणि बांगलादेश सारख्याच संघाविरुद्ध जास्त मिळाले आहेत. तब्बल १७ वर्ष या संघाला इंग्लंड संघाला घराच्या मैदानावर पराभूत करण्याचा करिष्मा विंडीज संघाने केला आहे.

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया
गेल्या १० वर्षात ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय उपखंडात केवळ दोन विजय मिळवता आले आहेत. त्यातील एक विजय पुणे येथे भारताविरुद्ध मिळाला आहे. भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ आशियायी भूमीवर कोणत्याही संघाला पराभूत करतात. त्यात ऑस्ट्रेलिया असो किंवा इंग्लंड असो कसोटी मालिकेत हे संघ हमखास भारतीय उपखंडात नांगी टाकतात. परंतु बांगलादेशला आपल्या शेजारील राष्ट्रांप्रमाणे हा करिष्मा करता येत नव्हता.

परंतु गेल्या एक वर्षात या संघाने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांना कसोटीत पराभूत केले आहे. बांगलादेशचा कसोटी क्रिकेटमधील हा केवळ १०वा विजय आहे. बांगलादेश संघाने घराच्या मैदानावर झालेल्या शेवटच्या दोन्ही कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये इंग्लंड तर ऑगस्ट २०१७ मध्ये ऑस्टेलिया संघावर हे विजय मिळवले आहे. ही या संघासाठी नक्कीच मोठी गोष्ट आहे.