जसप्रीत बुमराह- हार्दिक पंड्या जोडीने इंग्लंड गाजविले!

नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने मंगळवारी (21 आॅगस्ट) चौथ्या दिवसाखेर 9 बाद 311 धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताला विजयासाठी 1 विकेटची तर इंग्लंडला 210 धावांची गरज आहे.

या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात हार्दिक पंड्याने ६ षटकांत २८ धावा देत ५ विकेट्स घेतल्या तर दुसऱ्या डावात बुमराहने २९ षटकांत ८५ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.

यापुर्वी एकाच सामन्यात इंग्लंडमध्ये भारतीय गोलंदाजांनी असा कारनामा केवळ दोन वेळा केला आहे.

१९४६ला मॅंचेस्टर कसोटीत मोहिंदर अमरनाथ आणि विनु मंकड यांनी तर २०१४ला लाॅर्ड कसोटीत भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा यांनी असा कारनामा केला होता.

१९४६मध्ये तर इंग्लंडच्या पहिल्याच डावात मंकड आणि अमरनाथ यांनी ५-५ विकेट्स घेतल्या होत्या. अन्य कोणत्याही गोलंदाजाच्या वाट्याला विकेट आल्याच नव्हत्या.

तर लाॅर्ड्स कसोटीत भुवनेश्वर कुमारने इंग्लंडच्या पहिल्या डावात ६ तर इशांत शर्माने दुसऱ्या डावात ७ विकेट्स घेतल्या होत्या.

१९४६चा सामना अनिर्णित राहिला होता तर २०१४चा सामना टीम इंडिया जिंकली होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

इंग्लड विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटीत झाला हा खास विक्रम

केरळच्या महापूरात कुटुंब अडकल्यानंतरही भारताच्या या जलतरणपटूची एशियन गेम्समध्ये चमकदार कामगिरी

सर्व प्रश्नांचं उत्तर केवळ काळ देतो, रुट-कोहलीची ही आकडेवारी पाहुन कळेल नक्की कसे?