ही दोस्ती तुटायची नाय! शमी -बुमराहची कहानी, सगळ्यांमध्ये अनोखी

मेलबर्न। भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १३७ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी १५ विकेट्स घेत विजयात मोलाची भूमीका निभावली आहे.

या बरोबरच भारताचा मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने खास विक्रमही रचला आहे. एका संघाच्या दोन वेगवान गोलंदाजांनी एका वर्षात परदेशात प्रत्येकी ४० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट् घेणाच्या यादीत या दोघांचा समावेश झाला आहे.

या सामन्यात बुमराहने ८६ धावांत ९ विकेट्स घेतल्या तर शमीने ९८ धावांत ३ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच या दोघांनी २०१८ वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात ४० विकेट्स घेण्याचाही टप्पा पार केला आहे.

बुमराहने या वर्षात परदेशात ९ कसोटी सामन्यातील १८ डावात ४८ विकेट्स घेतल्या आहेत. तर शमीने ११ कसोटी सामन्यात २१ डावात ४५ विकेट्स घेतल्या आहेत.

याआधी एका संघाच्या दोन वेगवान गोलंदाजांनी कसोटीमध्ये एका वर्षात परदेशात प्रत्येकी ४० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट् घेण्याचा विक्रम याआधी विंडीजच्या जोएल गार्नर आणि कॉलीन क्रॉफ्ट यांनी १९८० मध्ये पहिल्यांदा केला होता.

त्यानंतर १९८४ मध्ये गार्नर आणि मालकोम मार्शल या जोडीने केला. त्यानंतर चार वर्षांनी मार्शल आणि कर्टली अँब्रोस यांच्या जोडीने हा पराक्रम केला होता.

विशेष म्हणजे हा विक्रम याआधी फक्त विंडीजच्या गोलंदाजांनी केला होता.पण आता यात भारताच्या शमी आणि बुमराह या जोडीचाही समावेश झाला आहे.

त्याचबरोबर बुमराह आणि शमी हे दोघेही कसोटीमध्ये परदेशात खेळताना भारताकडून एका वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत.

कसोटीमध्ये एका वर्षात परदेशात प्रत्येकी ४० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट् घेणारे एका संघाचे दोन वेगवान गोलंदाज –

१९८० – जोएल गार्नर – ५३ विकेट्स आणि कॉलीन क्रॉफ्ट – ४२ विकेट्स

१९८४ – जोएल गार्नर ४८ विकेट्स आणि मालकोम मार्शल – ५२ विकेट्स

१९८८ – मालकोम मार्शल – ४५ विकेट्स आणि कर्टली अँब्रोस – ४२ विकेट्स

२०१८ – जसप्रीत बुमराह – ४८ विकेट्स आणि मोहम्मद शमी – ४५ विकेट्स

महत्त्वाच्या बातम्या:

कर्णधार कोहली आणि नाणेफेकीच नातं जगावेगळं

भारताचा १५०वा कसोटी विजय, या देशाला पाजले सर्वाधिक वेळा पाणी

टीम इंडियाची कसोटी मालिकेत सरशी, ऑस्ट्रेलियाला १३७ धावांनी पराभवाचा धक्का