पृथ्वी शॉच्या टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ६व्याच षटकात ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर मॅक्स ब्रायंटला ईशान पोरेलने अभिषेक शर्माकडे झेल देण्यास भाग पाडले.

ब्रायंटने १२ चेंडूचा सामना करताना १४ धावा केल्या. परंतु त्यानंतर जॅक एडवर्ड्स आणि कर्णधार जेसन संघा यांनी डाव चांगलाच सावरला होता.

जेसन १९ चेंडूत ७ धावांवर खेळत असून चांगली फलंदाजी करत असलेला जॅक एडवर्ड्स २९ चेंडूत २८धावा करून बाद झाला.त्यालाही ईशान पोरेलनेच बाद केले.

सध्यस्थितीत ऑस्ट्रेलियाने १० षटकांत २ बाद ५२ धावा केल्या आहेत.

१९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आजपर्यंत ५ पैकी ३ लढती जिंकला आहे तर ऑस्ट्रेलियाने ४ पैकी ३ विजेतेपद मिळवली आहेत.