अबब! ५ भारतीयांसह आयसीसीचा १९ वर्षाखालील विश्वचषक ११चा संघ घोषित

दुबई । रविवारी घोषित झालेल्या १९ वर्षाखाली आयसीसी विश्वचषक ११ संघात भारताच्या पाच खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. ११ पैकी तब्बल ५ खेळाडूंनी आपल्या कामगिरीच्या जोरावर यात स्थान मिळवले आहे.

भारताने विक्रमी चौथ्यांदा विश्वचषक जिंकत मोठी कामगिरी केली. यात चमकदार कामगिरी करणाऱ्या कर्णधार पृथ्वी शॉ (२६१ धावा), अंतिम सामन्यातील सामनावीर मनजोत कारला(२५२), आणि मालिकावीर शुभमन गिल (३७२) या फलंदाजांचा तर समस्तीपूरचा रवींद्र जडेजा अशी ओळख निर्माण झालेला आणि स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा अनुकूल रॉय (१४) आणि आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा कमलेश नागरकोटी (९) यांचा समावेश आहे.

हा संघ ५ सदस्यांच्या पॅनलने निवडला असून त्यात वेस्ट इंडीजचा माजी वेगवान गोलंदाजइयान बिशप, भारताची माजी महिला कर्णधार अंजुम चोप्रा, न्यूझीलंडचे माजी कर्णधार जेफ क्रोव, पत्रकार शशांक किशोर आणि ऑस्ट्रेलियाचे माजी महान कर्णधार टॉम मूडी यांचा समावेश होता.

स्पर्धेत कर्णधार आणि फलंदाज म्हणून जबरदस्त कामगिरी करणाऱ्या शॉकडे मात्र आश्चर्यकारकरित्या या संघाचे नेतृत्व देण्यात आले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या रेनार्डवान टोंडरकडे या संघाचे नेतृत्व देण्यात आले असून त्याने स्पर्धेत ६ सामन्यात ३४८ धावा केल्या आहेत.

आयसीसीचा १९ वर्षाखालील विश्वचषक ११ संघ: पृथ्वी शॉ(भारत), मनजोत कालरा(भारत), शुभमान गिल (भारत), फिन एलेन (न्यूझीलंड), रेनार्डवान टोंडर (दक्षिण आफ्रिका, कर्णधार), वैंडिल माकवेतू (दक्षिण आफ्रिका, यष्टिरक्षक), अंकुल राय(भारत), कमलेश नागरकोटी (भारत), गेराल्ड कोएटजी (दक्षिण आफ्रिका), कैस अहमद (अफगाणिस्तान), शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान).

१२वा खेळाडू : एलिक अथांजे (विंडीज).