मुंबईकर पृथ्वी शॉला मिळणार आणखी एक खास बक्षीस!

भारताला १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकून देणाऱ्या पृथ्वी शॉच्या टीम इंडियावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आता त्यात आणखी एक भर पडली आहे ती मुंबई क्रिकेट असोशिएशनची.

मुंबई क्रिकेट असोशिएशनने आपल्या या लाडक्या खेळाडूला तब्बल २५ लाख रुपये देऊन सन्मानित करायचे ठरवले आहे.

याबद्दलचे अधिकृत ट्विट असोशिएशनचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले आहेत.

“विश्वकप विजेत्या भारतीय संघाचा कप्तान मुंबईकर पृथ्वी शाॅ याला मुंबई क्रिकेट एसोसिएशन तर्फे 25 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करताना मला अत्यंत आनंद होतो आहे. संपूर्ण संघाचे ही मनापासुन अभिनंदन!” असे शेलार यांनी म्हटले आहे.

बीसीसीआयने यापूर्वीच प्रत्येक खेळाडूला ३० लाखांच्या बक्षिसांची घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबईकर स्टार पृथ्वी शॉला एमसीए आणि बीसीसीआयकडून आता एकूण ५० लाखांचे बक्षीस मिळणार आहे.