अखेर भारताला सापडला १८ वर्षीय युवराज सिंग

क्राईस्टचर्च | भारतीय संघाने आज पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर विजय मिळवत १९ वर्षाखालील विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. या सामन्यात पुन्हा एकदा चमकला तो भारताचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला शुभमन गिल.

त्याने पाकिस्तान विरुद्ध ९४ चेंडूत नाबाद १०२ धावा केल्या. भारत-पाकिस्तान १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या लढतीत शतकी खेळी करणारा तो एकमेव खेळाडू बनला. तसेच या विश्वचषकात चार सामन्यात ६३, ९०*, ८६ आणि १०२* धावा केल्या सून त्याची सरासरी १७०.५० आहे.

यामुळे या खेळाडूवर भारतातून जोरदार कौतुक होत आहे.

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने शुभमनचे कौतुक करताना त्याला शुभमनमध्ये १८ वर्षांचा युवराज दिसत असलयाचे म्हटले आहे.

पंजाब संघाचा कर्णधार हरभजन सिंग आणि शुभमन गिल हे पंजाब वरिष्ठ संघात संघसहकारी असून शुभमन प्रथम श्रेणीचे पंजाबकडून २ सामने खेळला आहे. त्यात त्याने २१, ६३, ३२ आणि १२९ धावा केल्या आहेत.

“शुभमन जेवढ्या दर्जेदार गोलंदाजीचा सामना करेल तेवढी त्याच्यात सुधारणा होईल. तो जेवढ्या कठीण परिस्थिती आणि वातावरणात खेळेल तेवढं त्याला धावा कशा जमवतात हे कळेल. मी १८ वर्षांचा असताना युवराज सिंगल खेळताना पाहिले आहे. शुभमनही मला तेवढाच प्रतिभावान वाटतो. “असे कसोटीत भारताकडून ४१७ विकेट्स घेणाऱ्या हरभन सिंगने म्हटले आहे.

“त्याच्याजवळ एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे त्याचे फटके. असे फटके मॉडर्न क्रिकेटमध्ये (आजच्या क्रिकेटमध्ये) खेळाडूंकडे असायलाच हवेत. तो दिलस्कुप, रॅम्प शॉट तसेच इन्साईट आऊट लोफटेड फटके मारू शकतो. ” शुभमनच्या फलंदाजीचा चांगलाच अभ्यास असणारा हरभजन पुढे म्हणतो.

युवराज सिंग २००० साली १९ वर्षाखालील विश्वचषकात खेळला होता. त्यात त्याने ३३.८३च्या सरासरीने ८ सामन्यात २०३ धावा केल्या होत्या तर गोलंदाजीत ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले होते. या विश्वचषकातही शुभमनला मालिकावीर होण्याची मोठी संधी आहे.