पृथ्वी शॉच्या टीम इंडियाचे मुंबईमध्ये जंगी स्वागत

१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या पृथ्वी शॉच्या टीम इंडियाचे आज मुंबईमध्ये आगमन झाले. १९ वर्षाखालील क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी संघ ठरलेल्या टीम इंडियाने हा विश्वचषक तब्बल चौथ्यांदा जिंकला.

शनिवारी विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाच्या आगमनाची आज भारतीय चाहते आतुरतेने वाट पाहत होते. जेव्हा या संघाचे आज मुंबई विमानतळावर आगमन झाले तेव्हा चाहत्यांनी संघाचे जोरदार स्वागत केले तर माध्यमांचे प्रतिनिधी खेळाडूंच्या प्रतिक्रियांसाठी धडपडत होते.

खेळाडूंचे मुंबई विमानतळावर मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अधिकारण्यांनी स्वागत केले. दुपारी अंदाजे ३ वाजून ३० मिनिटांनी या संघाचे विमानतळावर आगमन झाले.