असा असेल यु मुम्बाचा प्रो कबड्डी २०१७ चा संघ…

पहिल्या मोसमापासूनच प्रो कबड्डीमधील पॉवर हाऊस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि रॉनी स्क्रूवाला मालक असणाऱ्या यु मुम्बा संघाने आपला कर्णधार अनुप कुमारला कायम ठेवत संघाची बांधणी केली.

पहिल्या मोसमात अंतिम फेरीत जयपूरकडून हार, दुसऱ्या मोसमात विजेतेपद, तिसऱ्या मोसमात पाटणा पायरेट्सकडून अंतिम फेरीत हार तर चौथ्या मोसमात पाचव्या क्रमांकावर घसरण असा आजपर्यंतचा यु मुम्बाचा प्रवास.

आपल्या विजेत्या कर्णधारावर विश्वास टाकत यु मुम्बाने अनुपकुमार ला संघात कायम ठेवले आहे. अर्जुन पुरस्कार विजेता हा खेळाडू यु मुम्बाबरोबर अगदी पहिल्या मोसमापासून आहे.

यावेळी यु मुम्बाने अतिशय आक्रमक असे रेडर अर्थात काशिलिंग आडके, नितीन मदने, शब्बीर बापू यांना संघात स्थान दिले आहे. जोगिंदर नरवालला संघात स्थान देताना त्याचा ऑल राउंडर खेळ आणि अनुभव याच महत्त्व मुंबईने ओळखलेलं दिसतंय.

चौथ्या मोसमात पाटण्याच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या इराणच्या हडी ओश्तोरॅकला मुंबईने संघात स्थान दिले आहे.

१८ खेळाडूंच्या संघात १५ भारतीय तर ३ परदेशी खेळाडूंना मुंबईने संघात स्थान दिले आहे. निर्धारित ४ कोटी रकमेपैकी मुंबईकडे फक्त १ लाख ३५ हजार शिल्लक राहिले.

असा असेल संघ

रेडर
अनुप कुमार, काशिलिंग आडके, नितीन मदने, शब्बीर बापू, दर्शन, श्रीकांत जाधव, मोहन रमण जी
बचाव
सचिन कुमार, डी. सुरेश कुमार, सुरेंदर सिंग, एन. रणजित
ऑल राउंडर
हडी ओश्तोरॅक(इराण), डोंगजू हाँग(दक्षिण कोरिया), यॉंगजू ओके(दक्षिण कोरिया), कुलदीप सिंग, शिव ओम, इ. सुभाष