प्रो कबड्डी- यु मुम्बा सर्वाधिक आक्रमक संघ

प्रो कबड्डी सीज़न ५ मधील ऑक्शनचे दोनही दिवस खूप रोचक आणि खेळाडूंसाठी स्पर्धेअगोदर बोनस देणारे ठरले. सर्व संघानी नीट नियोजित करत संघ निवडले. म्हणतात ना “गुड स्टार्ट इज हाफ डन” त्या प्रमाणे यू मुम्बा संघाने प्रो कबड्डी मधील अर्धी लढाई आधीच जिंकली आहे.

मुंबई संघाने यावेळी रेडरमध्ये अनुप कुमार, काशिलिंग आडके, नितीन मदने, शब्बीर बापू, दर्शन, श्रीकांत जाधव, मोहन रमण जी या दिग्गज खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामुळे हा संघ रेडिंगमध्ये सर्वात धोकादायक संघ होऊ शकतो.

अनुप कुमार-
भारतीय कबड्डीचा चेहरा असणारा हा खेळाडू यू मुम्बाचा कर्णधार आणि स्टार रेडर असणार आहे. बोनस किंग म्हणून लोकप्रिय असणाऱ्या या खेळाडूने कित्तेक सामन्यांचा निकाल आपल्या रेडींगच्या जोरावर यू मुम्बाच्या बाजूने फिरवला आहे. त्याने खेळलेल्या५७ सामन्यात ४११ गुण यु मुम्बा संघाला मिळवून दिले आहेत आणि त्यातील ३७७ रेडींगपॉईंटस् आहेत तर ३४ पॉईंटस् त्याने डीफेन्के करताना मिळवले आहेत. त्याचा खेळ हा गुणाकडे बघून जरी मोठा वाटत नसला तरी त्याचा प्रत्येक गुण हा समाना प्रभावित करणारा असतो.

शब्बीर बाप्पू –
अनुप कुमार याच्या मते ‘शब्बीर बापू’ हा जगातील टॉप 3 रेडरपैकी एक आहे. प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्रात त्याने अंतिम सामन्यात यू मुम्बा संघाला जिंकून देण्यात खूप मोठा वाटा उचलला होता. महत्वाच्या वेळी त्याने सूपर रेड टाकली आणि सामना यु मुम्बाच्या बाजूने झाला.त्याने ४२ सामन्यात १६२ पॉईंटस् मिळवले तर त्यातील १४९ हे रेडींग मध्ये मिळवले तर १३ डिफेन्समध्ये.

काशीलिंग अडके –
महराष्ट्रातील खेळाडू आणि महाराष्ट्रभर काश्या म्हणून लोकप्रिय असलेलाहा खेळाडू यू मुम्बासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो.आपल्या हनुमान उडीने त्याने कित्येकदा डिफेंडर्सचा साखळी खेळ उध्वस्त करून संघाला विजयी केले आहे.त्याने एका सामन्यात सर्वाधिक २४ गुण घेण्याचा विक्रम तेलुगू टायटन्स विरूध्द केलेला आहे. त्याने ५२ सामन्यात खेळताना ४०६ गुण मिळवले आहेत तर त्यातील ३८० रेडींग मध्ये मिळवले आहेत.तर २६ डिफेन्समध्ये मिळवले आहेत.

नितीन मदने-
नितीन हा देखील काशीलिंग अडकेप्रमाणे महाराष्ट्रातील सांगलीचा आहे. प्रो कबड्डी सीज़न १ मध्ये चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू दुखापतीने त्रस्त असल्याने त्या नंतर जास्त खेळू शकला नाही पण आपल्या खेळाने त्याने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने २३ सामन्यात १६० गुण मिळवले असून त्यातील १५२ रेडींगमधील आहेत.

कुलदीप सिंग-
यू मुम्बाने खेळलेला एक स्मार्ट मूव म्हणून आपण याकडे पाहू शकतो. कुलदीप एक उत्तम अष्टपैलू असून त्याच्या अँकेल होल्डपासून वाचणे खूप अवघड आहे पण तो उत्तम कामचलाऊ रेडरही आहे. त्याने मिळवलेल्या एकूण १२५ पॉईंटस् पैकी ४३ पॉईंटस् त्याने रेडींगमध्ये मिळवले आहेत.
या खेळाडूमुळे यू मुम्बाचे आक्रमण खूप धारधार वाटते आणि यू मुम्बा आरामात सेमी फाइनल पर्यंत पोहोचेल असे वाटते.