या कारणामुळे यु-मुंबाने नाही केला एकही खेळाडू लिलावापुर्वी रिेटेन!

मुंबई | आज प्रो-कबड्डीच्या 6व्या हंगामासाठी लिलाव पार पडत आहे. लिलावापूर्वी खेळाडू जेव्हा रिटेन केले गेले तेव्हा यु-मुंबा आणि युपी योद्धाज संघाने एकही जुन्या खेळाडूला संधी न दिल्यामुळे चाहत्यांसह सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.

याबद्दल महा स्पोर्ट्सशी बोलताना यु-मुंबाचे प्रमुख रोनी स्कृवालांनी यावर प्रकाश टाकला. “आम्ही गेले 5 हंगाम खेळत आहोत. त्यात आम्ही पहिले 3 हंगाम चांगली कामगिरी केली परंतु शेवटचे दोन हंगाम आम्हाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. याचमुळे एक नविन संघ बांधण्याचा आम्ही विचार केला आहे. आम्ही एक-दोन खेळाडू गेल्या हंगामातील नक्की रिटेन करणार आहोत. तसेच आम्ही 3 खेळाडू “फ्युचर कबड्डी हिरोज(FKH)” या राष्ट्रीय प्रतिभा शोध कार्यक्रमातीलही घेतले आहेत. ” असे ते म्हणाले.

प्रशिक्षकांबद्दल विचारले असता ते म्हणाले, ” आम्ही यावेळी एक इराणी आणि एक भारतीय आर्मीमधील माजी आॅफीसरची निवड केली आहे. जागतिक दर्जाचे खेळाडूंना मार्गदर्शन मिळावे तसेच संघात एक शिस्त असावी म्हणुन आम्ही ही या दोन दिग्गज खेळाडूंची निवड केली आहे. त्यात जे प्रशिक्षक इराणचे आहेत त्यांचा अनुभव मोठा अाहे. त्यांनी इराणमध्ये सर्व प्रकारच्या संघांसोबत काम केले आहे. ”

उदया लिलावाचा शेवटचा दिवस आहे आणि आॅक्टोबरमध्ये या लीगच्या 6व्या हंगामाला सुरुवात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली

या दिग्गज माजी खेळाडूची पुणेरी पलटणच्या प्रशिक्षकपदी निवड

महाराष्ट्राच्या या तीन खेळाडूंवर लागु शकते प्रो-कबड्डीत सर्वाधिक बोली

संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावासाठी महाराष्ट्राचे हे ४२ खेळाडू आहेत उपलब्ध

आयपीएलप्रमाणेच प्रो-कबड्डी लिलावातही वापरता येणार आरटीएम

कबड्डी- ई भास्करन तमिल थलाइवाजचे मुख्य प्रशिक्षक

प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी ९ संघानी २१ खेळाडूंना केले कायम