यू पी योद्धाज भिडणार बेंगलुरू बुल्स बरोबर !

आज प्रो कबड्डीच्या ५व्या मोसमातील ५१वा सामना नितीन तोमरच्या यू पी योद्धाज आणि रोहित कुमारच्या बेंगलुरू बुल्स यांच्यात होणार आहे. योद्धजला त्यांच्या घरच्या मैदानावरील शेवटच्या सामन्यात यश मिळाले आहे. बेंगलुरू बुल्स विजयाचा फॉर्म्युला विसरली आहे असे दिसून येते.

यू पी योद्धाजने आपल्या मागील ३ सामन्यात १ हार १ विजय आणि १ सामना बरोबरीत राखला आहे. संघाचा कर्णधार नितीन आणि रेडर रिशांक चांगल्या फोरमध्ये आहेत. त्याच बरोबर संघातील सर्वात अनुभवी खेळाडू जिवा कुमार ही डिफेन्स मध्ये चांगली कामगिरी करत आहे.

तर दुसऱ्या बाजूला बेंगलुरू बुल्सला सलग ४ सामन्यात प्रभाव पत्करावा लागला आहे. कर्णधार रोहित कुमार चांगला खेळ करत आहे आणि त्याला अजय कुमार चांगली साथ देत आहे. पण संघाच्या डिफेन्सने या मोसमात खूप निराश केले आहे. जर यू पी च्या रेडरने भरलेल्या संघाला बेंगलुरू बुल्सला हरवायचे असेल तर त्यांच्या डिफेन्सने चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे.