पृथ्वी शॉच्या टीम इंडियाने असा केला द्रविडचा वाढदिवस साजरा

भारताचा माजी कर्णधार ‘द वॉल’ राहुल द्रविडचा आज ४५ वा वाढदिवस आहे. त्याचा हा वाढदिवस त्याने १९ वर्षांखालील भारतीय संघाबरोबर साजरा केला. याचा व्हिडीओ बीसीसीआयने त्यांच्या वेबसाइटवर शेयर केला आहे.

या व्हिडीओमध्ये असे दिसते की द्रविडने केक कापल्यावर त्याला लगेचच सर्व १९ वर्षांखालील खेळाडूंनी घेरून तो केक त्याच्या चेहेऱ्याला लावला.

सध्या द्रविड १९ वर्षांखालील भारतीय संघाचा प्रशिक्षक आहे. त्यामुळे तो १३ जानेवारी पासून सुरु होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाबरोबर न्यूझीलंडमध्ये आहे.

१९ वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषकाच्या सराव सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध १८९ धावांनी मोठा विजय मिळवत या विश्वचषकाची सकारात्मक सुरुवात केली आहे.

द्रविडला आज सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण या त्याच्या संघासहकाऱ्यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. हे तिघे काही वर्षांपूर्वी भारतीय संघाचा अविभाज्य भाग होते.