मॅटबरोबरच मातीवरची कबड्डीही टिकली पाहिजे – उद्धव ठाकरे 

मुंबई । आज फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचे उदघाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी मॅटबरोबरच मातीवरची कबड्डीही टिकली पाहिजे असे मत व्यक्त केले. 

“आज कबड्डी बदलली आहे. कबड्डी आता मॅटवर खेळली जाते. ही कबड्डी नक्कीच वाढली पाहिजे परंतु याबरोबर मातीवरची कबड्डीही वाढली पाहिजे. ” असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. 

यावेळी त्यांनी मुंबई शहरात मॅटवरील कबड्डीसाठी एक इनडोअर स्टेडियम बनवायची घोषणा केली. ” शासन आणि आमच्यातील नातं आपणास माहीतच आहे. त्यामुळे शासनाकडून माहित नाही परंतु मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मात्र मुंबई शहरात एक इंदोर स्टेडियम लवकरच होईल. ” असे आश्वासन त्यांनी दिले. 

“प्रो कबड्डी आणि फेडरेशन कप यांच्या लोकप्रियतेनंतर आता हा खेळ ऑलिम्पिकमध्ये जायला हवा आणि याचे पहिले गोल्ड मेडल भारतालाच मिळायला हवे. ” असेही ते पुढे म्हणाले.