आयपीएलचा एकही सामना न खेळता टी२० क्रिकेटमध्ये ५ हजार धावा करणारे खेळाडू

टी२० लीग क्रिकेटमध्ये सर्वाधिक लोकरप्रिय स्पर्धा म्हणून इ्ंडियन प्रिमियर लीगकडे पाहिले जाते. या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना प्रसिद्धी आणि पैसा या दोन्ही गोष्टी मिळतात. 

तसेच अनेक व्रिकमही इ्ंडियन प्रिमियर लीगमध्ये होतात. त्याची चांगलीच दखल घेतली जाते. ही लीग जवळजवळ दोन महीने चालत असल्यामुळे खेळाडूंना धावांचे डोंगर उभे करता येतात. 

असे असले तरी असे काही खेळाडू आहेत ज्यांनी ह्या लीगमध्ये एकही सामना न खेळता बाकी लीग खेळता ५ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. 

त्यात उमर अकमल आणि अहमद शाहजाद या पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश आहे. अहमद शाहजादने १९३ सामन्यात २९.१८च्या सरासरीने ५३१२ धावा केल्या आहेत.

तर उमर अकमलने काल २३७व्या सामन्यात ५ हजार धावांचा टप्पा पार केला. त्याने २९.१५च्या सरासरीने ५०४४ धावा केल्या आहेत. 

 

पाकिस्तान सोडून कोणत्याही देशातील खेळाडूला अशी कामगिरी अाजपर्यंत जमली नाही.