२१ व्या शतकात अशी कामगिरी करणारा उमेश यादव पहिला भारतील गोलंदाज

हैद्रबाद। भारत विरुद्ध विंडिज संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात विंडिजचा दुसरा डाव 127 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 72 धावांचे आव्हान आहे.

भारताकडून या डावात उमेश यादवने 45 धावांत 4 विकेट घेत महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याचबरोबर त्याने पहिल्या डावातही 88 धावांत 6 विकेट घेण्याची मोलाची कामगिरी केली होती. त्यामुळे त्याने आता या कसोटीत 133 धावांत 10 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.

याबरोबरच उमेशने एक खास विक्रमही केला आहे. तो 21 व्या शतकात मायदेशात एका कसोटी सामन्यात 10 विकेट घेणारा भारताचा पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे.

तसेच मायदेशात आत्तापर्यंत एका कसोटी सामन्यात 10 विकेट घेणारा एकूण तिसराच वेगवान गोलंदाज ठरला आहे. याआधी अशी कामगिरी कपिल देव आणि जवागल श्रीनाथ यांनी केली आहे. कपिल देव यांनी 1980 आणि 1983 मध्ये असे 2 वेळा तर श्रीनाथ यांनी 1999मध्ये आणि उमेशने या सामन्यात हा पराक्रम केला आहे.

त्याचबरोबर उमेशची मायदेशात भारतीय वेगवान गोलंदाजांनी केलेली तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम गोलंदाजी ठरली आहे. या यादीत श्रीनाथ हे अव्वल क्रमांकावर आहेत. त्यांनी 1999 ला कोलकाता येथे पाकिस्तान विरुद्ध 132 धावांत 13 विकेट घेण्याची कामगिरी केली होती.

कपिल देव हे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनीही पाकिस्तान विरुद्ध 1980 ला चेन्नई येथे 146 धावांत 11 विकेट घेतल्या होत्या. तर उमेशने या सामन्यात 133 धावांत 10 विकेट घेतल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

हैद्राबाद कसोटी जिंकण्यासाठी भारतासमोर ७२ धावांचे आव्हान

उत्तम फलंदाज असला तरी कोहलीला कर्णधार म्हणून अजून सिद्ध करायचे आहे…

भारताच्या या दिग्गजाने रिषभ पंतची गिलख्रिस्टशी केली तुलना