या गोलंदाजाला आॅस्ट्रेलिया दौऱ्यात मिळणार १००% संधी

विंडिजविरूद्धच्या कसोटी मालिकेत 11 विकेट घेणाऱ्या उमेश यादवने आॅस्ट्रेलिया दौऱ्यात अंतिम अकरा खेळाडूतील आपले स्थान अधिक मजबुत केले आहे, असे कर्णधार विराटनेच म्हटले आहे.

भारतीय संघाची आॅस्ट्रेलिया दौऱ्यतील चार कसोटी सामन्यांची मालिका 6 डिसेंबरला सुरू होणार आहे.

“उमेशने त्याच्या कार्यकिर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शन केले आहे. या कामगिरीला तो अधिक उंचावण्याचा प्रयत्न पुढे  करेल.” असे कोहलीने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

“आॅस्ट्रेलियातील चार कसोटी सामन्यांत भारतीय संघाला संघर्ष करावा लागू शकतो. आॅस्ट्रेलियात कुकाबुरा चेंडू  इंग्लमधील ड्युक चेंडू पेक्षा वेगळा असतो. यासाठी तुम्हाला संपुर्ण दिवसभर अचुक टप्यावर गोलंदाजी करावी लागते. त्या दृष्टीने उमेश आॅस्ट्रेलियात खेळण्यासाठी एकदम उत्तम गोलंदाज आहे.” असेही कोहलीने सांगितले.

संघातील चारही वेगवान गोलंदाज जर 140 पेक्षा वेगाने गोलंदाजी करत असतील आणि विकेट मिळवत असतील तर या गोलंदाजांना संघात ठेवण्याचा कोणताही कर्णधारचा प्रयत्न असेल. यात आॅस्ट्रेलियातील वेगवान खेळपट्यांवर उमेशच्या वेगाचा उपयोग होणार आहे.

शार्दुल ठाकुरला विंडिजविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात पदार्पणाच्या सामन्यातच मांडीचे स्नायु दुखवल्यामुळे बाहेर जावे लागले. त्यामुळे उमेश यादव हा एकटाच वेगवान गोलंदाज संघात होता. उमेशने या सामन्यात 39 षटके टाकले. त्यावरून त्याच्या फिटनेसचा अंदाज येतो.

विराटच्या या वक्तव्यांवरून उमेशचा समावेश आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. तेथील खेळपट्यांच्या अंदाजावरून त्याला अंतिम अकरा खेळाडूतही स्थान दिले जाणे जवळपास पक्के आहे.

महत्वाच्या बातम्या-