वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरी चोरी

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या नागपूर येथील येथील घरी चोरी झाली आहे. ही चोरी सोमवारी झाली असून त्यात ४५ हजारांची रोकड रक्कम आणि मोबाइल चोरीला गेल्याच वृत्त आहे.

शंकरनगर या नागपूर मधील उच्चभ्रू परिसरात भारताच्या या वेगवान गोलंदाजचे घर असून सोमवारी संध्याकाळ ते मध्यरात्र या दरम्यान चोरी झाल्याचं अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

भारताचा हा वेगवान गोलंदाज नुकताच वेस्ट इंडिज दौऱ्यावरून परत आला असून जेव्हा चोरी झाली तेव्हा तो कुटुंबाबरोबर एका खाजगी कार्यक्रमासाठी बाहेर गेला होता. जेव्हा कार्यक्रमानंतर उमेश घरी आला तेव्हा त्याला या चोरीची माहिती समजली. त्यांनतर त्याने नागपूर पोलिसांत याप्रकरणी तक्रार दिल्याचं वृत्त आहे.

२६ जुलै पासून सुरु होणाऱ्या तीन कसोटी सामान्यांच्या मालिकेसाठी उमेश यादवची निवड झाली असून हा खेळाडू लवकरच श्रीलंकेला रवाना होणार आहे.