पाथरी, परभणीत १७ वर्षा खालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरुवात

– अनिल भोईर

क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय १७ वर्ष मुले/मुली कबड्डी स्पर्धा २०१८-१९ चे आयोजन परभणी येथे करण्यात आले आहे.

यास्पर्धेचे उद्घाटन १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता जिल्हा परिषद अध्यक्षा उज्जवलाताई राठोड याच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खाजदार संजय जाधव असणार आहेत. त्याच बरोबर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राज्यस्तरीय शालेय १७ वर्ष मुले/मुली कबड्डी स्पर्धेविषयी सर्व काही:

स्पर्धेत सहभागी संघ- यास्पर्धेसाठी राज्यातून मुंबई, पुणे अमरावती, नागपूर, नाशिक, लातूर, औरंगाबाद, कोल्हापूर या आठ विभागातून १७ वर्ष मुलाचा/ मुलीचा प्रत्येकी १-१ संघ सहभाग घेणार असून आठ विभागातून १६ संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत.

स्पर्धाचा कालावधी- या कबड्डी स्पर्धेचे आयोजन १९ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर दरम्यान तीन दिवस करण्यात आले आहे. सामने दिवस-रात्र सत्रात खेळवण्यात येतील.

स्पर्धाचे ठिकाण- कबड्डी महर्षी स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी क्रीडा नगरी, श्री साई क्रीडा मंडळ जायकवाडी वसाहत, पाथरी ता. पाथरी जि. परभणी येथे आयोजन केले आहे.

निवास व्यवस्था- स्पर्धेत सहभागी होण्याऱ्या संघाची व्यवस्था मुलींसाठी मुलीचे शासकीय वस्तीगृह तर मुलांची साईबाबा जन्मस्थान मंदिरातील भक्त निवासस्थानी करण्यात आली आहे.

निवड चाचणी- शेवटच्या दिवशी २१ सप्टेंबर रोजी निवड चाचणी घेण्यात येणार आहे. यास्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा १७ वर्ष मुलाचा व मुलीचा संघ निवडला जाणार असून हा संघ राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल.

महत्त्वाच्या बातम्या-

एशिया कप २०१८: भारताच्या या विक्रमाशी बरोबरी करण्याची पाकिस्तानला संधी

-एशिया कप २०१८: भारत-पाकिस्तान सामन्यासाठी इम्रान खान लावणार हजेरी

-टॉप ५: शिखर धवनने दमदार शतक करत केले हे खास विक्रम