टीम इंडियाने या गोलंदाजाला घेतले इंग्लंडला बोलावून, घेऊ शकतो भूवनेश्वर कुमारची जागा

गुरुवारी(27 जून) भारतीय संघ 2019 विश्वचषकात विंडीज विरुद्ध खेळणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाने वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला भारतीय फलंदाजांना नेटमध्ये सराव देण्यासाठी इंग्लंडला बोलावले आहे.

यावर्षी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळलेला नवदीप सैनी हा या विश्वचषकासाठी भारताच्या राखीव गोलंदाजांपैकी एक आहे.

याबद्दल हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या मीडिया विभागाने अधिकृत व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती दिली आहे की ‘नवदीप सैनी मॅनचेस्टरमध्ये पोहचला आहे. तो संघाबरोबर सराव करेल. तो इथे फक्त नेट बॉलर आहे.’

या विश्वचषकासाठी सुरुवातीला भारतीय संघाबरोबर दिपक चहर, आवेश खान आणि खलील अहमद हे तीन गोलंदाज नेटमध्ये फलंदाजांना सराव देण्यासाठी इंग्लंडला आले होते. पण काही दिवसांनी दिपक आणि आवेश हे दोघेही मायदेशी परतले.

तसेच खलील पुढील काही दिवसांसाठी भारतीय संघाबरोबरच कायम होता. पण तोही आता भारतात परतला आहे. त्याला पुढील महिन्यात भारत अ संघाबरोबर विंडीज दौरा करायचा आहे. त्यामुळे सध्या भारताकडे नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज नव्हता.

त्याचबरोबर भारताचा वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमारला पाकिस्तान विरुद्ध खेळताना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला काही सामने मुकावे लागण्याची शक्यता आहे. तो अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यालाही मुकला होता.

यामुळे जर भुवनेश्वरची दुखापत गंभीर असेल तर सैनीला संधी दिली जाऊ शकते. पण अजून भुवनेश्वरच्या दुखापतीबद्दल कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.

भारताने या विश्वचषकात अजून एकही पराभव स्विकारलेला नाही. त्यांनी आत्तापर्यंत 5 सामने खेळले असून चार सामने जिंकले आहेत. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

एकवेळच्या धोनीच्या सर्वात आवडत्या गोलंदाजाने केले क्रिकेटला अलविदा

या खेळाडूने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा होता विरोध

विश्वचषक २०१९: दक्षिण आफ्रिका हरली पण इम्रान ताहिरने रचला इतिहास