पुणे: ट्रिनिटी निमंत्रित क्रिकेट करंडक 2018 स्पर्धेत युनियन क्रिकेट क्लब संघाची विजयी सलामी

पुणे | ट्रिनिटी इंजिनिअरींग व इंजिन इनसाईट  प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित ट्रिनिटी निमंत्रित  क्रिकेट करंडक 2018 स्पर्धेत युनियन क्रिकेट क्लब संघाने एच के ईगल्स संघाचा 6 गडी राखून विजयी सलामी दिली.

के.जे इन्स्टिटयूट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या डावात एच के ईगल्स संघ 57.1षटकात 157धावांवर आटोपला.

यात निखिल वाघ 47, निखिल बराटे 42, शुभम जंगली 19, प्रभाकर ठाकूर 13यांनी धावा केल्या. युनियन क्रिकेट क्लबकडून संकेत जेवारी(4-30), सागर मगर(2-17), हितेन बनसोडे(2-24)यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात पहिल्या डावात युनियन क्रिकेट क्लबला 31.5षटकात 108धावाच करता आल्या. वेंकटेश दराडे 47, सागर मगर 22, रणजीत मगर 18यांनी थोडासा प्रतिकार केला.

एच के ईगल्सकडून सागर होगाडे(3-14), नितीन बरबत्ते(2-31), शुभम जंगवली(2-32)यांनी अफलातून गोलंदाजी करत संघाला 49धावांची आघाडी मिळवून दिली. 

दुसऱ्या डावात  हितेन बनसोडे(6-29)याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर  एच के ईगल्स संघाला 30.3षटकात 99धावावर कोसळला. यात  सागर होगाडे 43, संकल्प चव्हाण नाबाद 26यांनी धावा केल्या. हे आव्हान युनियन क्रिकेट क्लब संघाने 43.1षटकात 4बाद 152धावा करून पूर्ण केले. यात  संकेत जेवारी 45, अजिंक्य थिटे 27, रणजीत मगर 23, सागर मगर नाबाद 34यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला.   

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पहिला डाव: एच के ईगल्स: 57.1षटकात सर्वबाद 157धावा(निखिल वाघ 47, निखिल बराटे 42, शुभम जंगली 19, प्रभाकर ठाकूर 13, संकेत जेवारी 4-30, सागर मगर 2-17, हितेन बनसोडे 2-24)वि.युनियन क्रिकेट क्लब: 31.5षटकात सर्वबाद 108धावा(वेंकटेश दराडे 47, सागर मगर 22, रणजीत मगर 18, सागर होगाडे 3-14, नितीन बरबत्ते 2-31, शुभम जंगवली 2-32);  एच के ईगल्स संघ 49धावांची आघाडी

दुसरा डाव: एच के ईगल्स: 30.3षटकात सर्वबाद 99धावा(सागर होगाडे 43, संकल्प चव्हाण नाबाद 26, हितेन बनसोडे 6-29, अमरजीत चव्हाण 3-19, वेंकटेश दराडे 1-28)पराभूत वि.युनियन क्रिकेट क्लब: 43.1षटकात 4बाद 152धावा(संकेत जेवारी 45, अजिंक्य थिटे 27, रणजीत मगर 23, सागर मगर नाबाद 34, सागर होगाडे 2-31, संकल्प चव्हाण 1-14);युनियन क्रिकेट क्लब 6 गडी राखून विजयी.