यू पी योद्धाजला मिळणार का घरच्या मैदानावरील पहिला विजय ?

आज प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या २४व्या दिवशी ४३ वा सामना यू पी योद्धाज आणि तामिल थालयवाज यांच्यात होणार आहे. हे दोनीही संघ प्रो कबड्डीत नवीन आहेत. यू पी योद्धजला आपल्या घरच्या मैदानावर पहिल्या विजयाची आशा आहे. सलग ४ सामने घरच्या मैदानावर हरल्यानंतर यू पी योद्धाजच्या कर्णधार नितीन तोमरवर जास्त दबाव असणार आहे. घरच्या मैदानावर शून्य विजयाचा विक्रम यू पीला आपल्या नावे करायचा नसेल तर त्यांच्या डिफेन्सने चांगला खेळ करणे गरजेचे आहे.

दुसऱ्या बाजूला तामिल थालयवाज या संघाने या मोसमात आतापर्यंत सर्वात कमी सामने जिंकले आहेत आणि ते झोन बी च्या गुणतालिकेत तळाला आहेत. आतापर्यंतच्या ५ सामन्यत तामिल थालयवाजने फक्त एक सामना जिंकला आहे. मागील सामन्यात त्यांच्या संघाचा कर्णधार अजय ठाकूरने फॉर्ममध्ये येण्याचे संकेत दिले आहेत.

दोनीही संघ हे या मोसमात असमान खेळी करता आहेत व सामन्याच्या मोक्याच्या क्षणी सामन्यांवरची पकड गमावत आहे. त्यामुळे आजचा सामना खूपच रोमहर्षक होणार असे दिसून येत आहे.