प्रो कबड्डी: हे ६ संघ झाले प्ले ऑफसाठी पात्र, पहिल्या स्थानाचे महत्त्व किती?

प्रो कबड्डीमध्ये काल पुणे लेगच्या पहिल्या सामन्यात बेंगलूरु बुल्स आणि युपी योद्धा हे या सामन्यातून झोन बी अधून प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवणारा तिसरा आणि शेवटचा संघ मिळाला. काल सामना जरी बेंगलूरु बुल्स संघाने ३८-३२ असा जिंकला असला तरी ७ गुणांपेक्षा कमी फरकाने सामना गमावल्याने मिळणार महत्वाचा एक गुण मिळवत युपी योद्धा संघाने प्ले ऑफ स्थान मिळवले.

झोन ए मधील प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारे सर्व संघ जयपूर लेगमध्येच निश्चित झाले होते. पुणेरी पलटण संघासाठी होम लेग खूप महत्वाचा ठरणार आहे. कारण पुणेरी पलटणने जर का उर्वरित सर्व सामने जिंकले तर ते झोन ए मध्ये पहिल्या क्रमांक मिळवतील.

प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारे संघ –
# झोन ए –
१ गुजरात फॉरचून जायन्टस – २१ सामने, १४ विजय, ४पराभव, ३ बरोबरीत सामने, ८२ गुण
२ हरयाणा स्टीलर्स- २१ सामने, १२ विजय, ५पराभव, ४बरोबरी सामने, ७४ गुण
३ पुणेरी पलटण – १९ सामने, १४ विजय ,५ पराभव,७३ गुण

झोन बी –
१ बेंगाल वॉरियर्स -२१ सामने,११ विजय, ५ पराभव,५ बरोबरीत सामने,७४ गुण
२ पटणा पायरेट्स – २१ सामने, १० विजय, ७ पराभव, ४बरोबरीत सामने ,६८ गुण
३ युपी योद्धा – २१ सामने, ८ विजय, ९ पराभव, ४बरोबरीत सामने,६० गुण

पहिल्या स्थानाचे महत्व का?
जे संघ आपल्या आपल्या झोनमध्ये पहिल्या स्थानावर असणार आहेत ते प्ले ऑफमध्ये एकमेकांविरुद्ध एक सामना खेळतील आणि या सामन्यातून विजेता ठरेल तो थेट अंतिम सामना गाठेल. जो संघ सामना हरेल त्याला अंतिम सामना गाठण्यासाठीही संधी असणार आहे तो थेट बाहेर फेकला जाणार नाही.

यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर-
# या मोसमात नव्याने जे चार संघ प्रो कबड्डीशी जोडले गेले होते त्यातील तीन संघ गुजरात फॉरचूनजायन्टस ,हरयाणा स्टीलर्स आणि युपी योद्धा हे संघ प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत तर तमिल थलाइवाज एकमात्र नवीन सामील झालेला संघ आहे जो प्ले ऑफमध्ये स्थान बनवण्यात अपयशी ठरला.