प्रो कबड्डी: जिंकूनही बेंगळुरू बुल्स स्पर्धेतून बाहेर

प्रो कबड्डी पाचव्या मोसमातील शेवटचा लेग पुणे येथे खेळण्यात येत आहे. आज बंगलुरू बुल्स आणि यूपी योद्धाज यांच्यातील सामन्यात बंगलुरूने ३८-३२ असा विजय मिळवला . बंगलुरूला जर झोन बी क्वालिफाय होण्यासाठी ७ च्या फरकाने जिंकणे गरजेचे होते पण ते असे करण्यात ते अपयशी ठरले आणि त्यामुळे यूपी या मोसमातील प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा शेवटचा संघ बनला.

सामन्याच्या पहिल्याच रेडमध्ये बंगलुरू बुल्सचा कर्णधार रोहित कुमारने बोनस गुण मिळवून संघासाठी चांगली सुरुवात करून दिली. तर दुसऱ्या बाजूला नितीन तोमर संघात नसल्यामुळे संघाचे नेतृत्व करणाऱ्या रिशांक देवाडिगाने पहिल्याच रेडमध्ये यूपीच्या दोन खेळाडूंना बाद केले.

बंगलुरू बुल्सचा अनुभवी डिफेंडर रवींद्र पेहलही लयमध्ये दिसला. त्याने पहिल्या सत्रात २ गुण मिळवले तर महेंद्र सिंगने ४ गुण मिळवले. पहिल्या सत्रात ७ व्या मिनिटाला रोहित कुमारला यूपीच्या डिफेन्सने सुपर टॅकल केले. पण त्यानंतर बंगलुरूने डिफेन्समध्ये आणि रेडमध्ये चांगला खेळ करत यूपीला १६व्या मिनिटाला सर्वबाद केले.

दुसऱ्या सत्राच्या ६व्या मिनिटाला यूपीचा संघ दुसऱ्यांदा सर्वबाद झाला. पहिल्या सत्राप्रमाणेच रिशांक या ही सत्रात शांतच राहिला. पण यूपीचा दुसरा रेडर सुरेन्द्र सिंग नियमित कालांतराने गुण मिळवत होता . २९व्या मिनिटाला जेव्हा बंगलुरूचे फक्त २ खेळाडू मैदानात होते तेव्हा त्याच्या डिफेन्सने रिशांकला सुपर टॅकल केले आणि ऑल आऊट टाळला.

सामना संपण्यासाठी ६ मिनिट राहिले असताना बंगलुरूच्या डिफेन्सने आणखीन एक सुपर टॅकल केला आणि कर्णधार रोहित कुमारला मॅटवर परत आणले. पण आखिर १६व्या मिनिटाला बंगलुरूचा संघ ऑल आऊट झाला आणि स्कोर बंगलुरू बुल्स ३३ यूपी योद्धाज २७ असा झाला.

५ गुणांच अंतर कमी करण्यासाठी यूपीला आपल्या कर्णधाराकडून विशेष कामगिरीची अपेक्षा होती. रोहित कुमारने दुसऱ्या सत्राच्या १६व्य मिनिटाला आला सुपर १० पूर्ण केला. पण संघाला ८ गुणांच्या फरकाने विजय मिळवून देण्यात अपयश आले.

याबरोबर युपी योद्गाज या स्पर्धेतील शेवटचा संघ ठरला जो प्ले ऑफसाठी पात्र ठरला.