युपी योद्धाज करणार का आज पात्रता फेरीत प्रवेश

आज रात्री जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध लढणार यु.पी.योद्धा हा सामना होणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ जोरदार प्रयत्न करणार आहे. कारण इंटर झोन संपण्यासाठी यानंतर फक्त २ सामने उरलेले आहेत.

त्यामुळे हा सामना खूपच चुरशीने होणार आहे. या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सचा कर्णधार मंजीत चिल्लर आणि यु.पी.योद्धाचा डिफेंडर गुरविंदर सिंग त्यांच्यातही चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे.

जयपूर पिंक पँथर्स संघाने मागील सलग ३ सामने हरलेले आहेत. त्यांचा मागील सामना हरयाणा स्टीलर्स या संघासोबत होता. हा सामना जयपूर पिंक पँथर्स २७-३७ असा १० गुणांच्या फरकाने ते हरले.

रेडर पवन कुमार, राहुल चौधरी, तुषार पाटील यांनी सामना जिंकण्याचा खूप प्रयत्न केला परंतु संघाच्या डिफेंडरची पाहिजे अशी साथ त्यांना मिळाली नाही. तसेच त्यांना पुढील संघाचा रेडर पाहिजे तेव्हा थांबवता आला नसल्यामुळे हरयाणा स्टीलर्सच्या गुणांमध्ये वाढ होत गेली.

यु.पी.योद्धा या संघाचा मागील सामना तमील थलाइवाज या संघासोबत होता. यु.पी.योद्धाने तमील थलाइवाज विरुद्धचा हा सामना ३७-३३ असा जिंकला होता. संघाचा कर्णधार नितीन तोमरने या सामन्यात सर्वात जास्त १२ गुण मिळविले आहेत. या सामन्यात सर्वात जास्त गुण मिळवणारा खेळाडू आहे. त्यानंतर रिशांक देवाडिगा याने ९ आणि महेश गौड याने ३ गुण मिळविले आहे. तर डिफेंडर नितेश कुमारने ० व सागर क्रिष्णाने १ गुण मिळविला. परंतु डिफेंडर्सला पाहिजे अशी साथ देता आली नाही.

आजचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघाना जोरदार प्रयत्न तर करावेच लागणार आहे, तसेच संघातील सर्वच खेळाडूंची त्यांना साथ मिळविणे आवश्यक आहे. केवळ ४ ते ५ खेळाडूंनी खेळून सामना जिंकता येणार नाही. यु.पी.योद्धाच्या संघातील डिफेंडरना आपली कामगिरी सुधारवण्याची संधी या सामन्यात आहे. तसेच मागील सामने हरलेला संघ जयपूर पिंक पँथर्सना पुनरागमन करून जिंकण्याची संधीही त्यांना या सामन्यात मिळाली आहे.