अशी कामगिरी करणारा ४६ वर्षातील तो पहिलाच कर्णधार

 

आबू धाबी । येथे सुरु असलेल्या पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडेत श्रीलंकेचा कर्णधार उपुल थरंगाने संघातील सर्व क्रमांकांच्या खेळाडूंबरोबर फलंदाजी केली. सलामीला आलेला थरंगा शेवटपर्यंत नाबाद राहिला.

याबरोबर उपुल थरंगाने एक मोठा विक्रम केला. कर्णधार म्हणून संपूर्ण डावात फलंदाजी करून नाबाद राहण्याचा विक्रम आता त्याच्या नावे झाला आहे. यापूर्वी असा विक्रम ४६ वर्षांत कोणत्याही कर्णधाराकडून झाला नाही.

आजपर्यंत अशी कामगिरी ११ खेळाडूंनी केली आहे.

यात ग्रॅण्ट फ्लॉवर, सईद अन्वर, निक नाइट, जेकब्स, मार्टिन, हर्षल गिब्स, स्टीवर्ट, जेकब ओरम आणि अझहर अली या खेळाडूंचा समावेश आहे.

परंतु यातील कोणताही कर्णधार ही कामगिरी करताना संघाचे नेतृत्व करत नव्हता.

कर्णधार म्हणून अशी कामगिरी केवळ उपुल थरंगालाच करता आली आहे.

पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना लंकेला ५० षटकांत २२० धावांचे लक्ष दिले. हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून श्रीलंका संघ मैदानात उतरला. कर्णधार उपुल थरंगा सलामीला फलंदाजीला येऊन १३३ चेंडूत १०१ धावा करून नाबाद राहिला. त्याला दुसऱ्या बाजूने कोणत्याही खेळाडूने विशेष साथ दिली नाही.

शेवटी ४८ षटकांत १८७ धावांवर लंकेचा डाव संपुष्ठात आला.

या मालिकेत पाकिस्तान २-० असे आघाडीवर आहे.