जेव्हा तो फलंदाज काल दिवसात दोन वेळा बाद झाला !

पल्लेकेल: येथे सुरू असलेल्या श्रीलंका आणि भारत विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात उपुल थरांगा हा फलंदाज दिवसात दोन वेळा बाद झाला. आज श्रीलंकेचा पहिला डाव १३५ धावत गुंडाळल्यानंतर पुन्हा फलंदाजीला उतरलेल्या लंकेचा सलामीवीर उपुल थरांगा पुन्हा बाद झाला.

आज भारतच डाव पहिला डाव ४८७ धावांमध्ये संपुष्ठात आला. त्यांनतर दुसऱ्या सत्रात फलंदाजीला आली. त्यांनतर श्रीलंकेचा उपुल तरंगाला मोहम्मद शमीने ५ धावांवर वृद्धिमान सहा करवी झेलबाद केले. त्यांनतर श्रीलंकेचा पहिला डाव आजच्या तिसऱ्या सत्रात १३५ धावांवर संपुष्ठात आला.

तिसऱ्या सत्रात भारतीय कर्णधार विराट कोहलीने फॉलो-ऑन देऊन श्रीलंकेला पुन्हा फलंदाजीला पाचारण केले. दिवसातील शेवटची १३ षटके असल्यामुळे दोनही सलामीवीर अतिशय लक्ष देऊन प्रत्येक चेंडूंचा सामना करत होते. करुणरत्ने ३९ धावांत १२ वर तर तरंगा ३० चेंडूत ७ धावांवर खेळत होते. शेवटचे १४ चेंडू बाकी असताना उमेश यादवने तरंगाला त्रिफळाचित केले.

अशा प्रकारे तरंगा दिवसात दुसऱ्यांदा बाद झाला.