युएस किड्स गोल्फ इंडिया टूर: कौशल, तन्मय, कनिष्क, विदीश यांची चमक

पुणे। यूएस किड्स गोल्फ इंडिया टूरच्या पुण्यात झालेल्या सहाव्या टप्प्यात १५ ते १८ वर्षांखालील मुलांच्या गटात कोलकात्याच्या कौशल बग्रोडिया, पुण्याचा तन्मय नेगी आणि कनिष्क लुंगड यांनी चमक दाखवली. तर, ११ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात पुण्याच्या विदीश कर्दभाजने याने १८ होल्स ८२ स्ट्रोक्समध्ये पूर्ण करुन (१० ओव्हर पार) अव्वल स्थान पटकाविले. तसेच पुण्याचा शमित डाखणे हा ८६ स्ट्रोक्ससह (१४ ओव्हर पार) द्वितीय स्थानावर राहिला.

पूना क्लब गोल्फ कोर्सवर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेल १५ ते १८ वयोगटात कौशलने १८ होल्स ७० स्ट्रोक्समध्ये पूर्ण करून २ अंडर पार स्कोअरसह अव्वल स्थान मिळवले. पुण्याच्या तन्मय नेगी ७१ स्ट्रोक्ससह (१ अंडर पाससह) दुस-या स्थानावर राहिला, तर कनिष्क लुंगडने ७४ स्ट्रोक्ससह (२ ओव्हर पार) तिसरे स्थान मिळवले. १५ ते १८ वर्षांखालील मुलींच्या गटात खारघरच्या गौरी क-हाडेने १८ होल्स ७९ स्ट्रोक्समध्ये पूर्ण करून सेव्हन ओव्हर पार स्कोअर नोंदविला आणि अव्वल स्थान पटकावले.

यूएस किड्स गोल्फ इंडियाचे अध्यक्ष राजेश श्रीवास्तव म्हणाले, युवा गोल्फपटूंचा शोध घेण्यासाठी यूएस किड्स गोल्फ इंडिया टूरचे आयोजन करण्यात आले आहे. या टूरच्या २०१८-१९च्या मोसमातील या आधीचे टप्पे दिल्ली-एनसीआर, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद येथे झाले आहेत. या स्पर्धेसाठी भारतातून आणि परदेशातून येणा-या प्रतिसादाने आम्ही आनंदित झालो आहोत. यासाठी आम्ही या युवा गोल्फपटूंचे आणि त्यांचे पालकांचे आभारी आहोत. देशात अशा प्रकारची सुयोग्य नियोजन असलेली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्युनियर स्पर्धा प्रथमच होत आहे. युवा गोल्फपटूंना एक व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. क्रिकेटसारखेच या खेळाला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

निकाल :
६ आणि त्या वर्षांखालील मुले – ९ होल्स – प्रियान कांतावाला (मुंबई) – ४६ स्ट्रोक्स. एकवीरसिंग मल्होत्रा (कोलकाता) – ५६ स्ट्रोक्स.
७ वर्षांखालील मुले – ९ होल्स – रायन साव (कोलकाता) – ४४ स्ट्रोक्स, दर्षित (कोलकाता) – ४५ स्ट्रोक्स, कबीर गाला (मुंबई) – ४९ स्ट्रोक्स. मुली – जिया कर्दभाजने (पुणे) – ४० स्ट्रोक्स, नैना कपूर (गुडगाव) – ४६ स्ट्रोक्स.
८ वर्षांखालील मुले – ९ होल्स – सुहान शहा (गुजरात) – ४७ स्ट्रोक्स. मुली – पर्णिका शर्मा (नोएडा) – ४१ स्ट्रोक्स, रेया कुमार (दिल्ली) – ४३ स्ट्रोक्स.
९ वर्षांखालील मुले – १८ होल्स – भावेश निरवान (नोएडा) – ७३ स्ट्रोक्स, सिवामूर्ती (कोइम्बतूर) – ७५ स्ट्रोक्स.
१० वर्षांखालील मुले – १८ होल्स – आदित्य खैतान (कोलकाता) – ७७ स्ट्रोक्स, प्रशांत अगरवाल (कोलकाता) – ८० स्ट्रोक्स, उदय आदित्य मिद्धा (दिल्ली) – ८२ स्ट्रोक्स.
११ वर्षांखालील मुली – १८ होल्स – पलाक्षी शेहरावत (दिल्ली) – ७४ स्ट्रोक्स, सेरेना खन्ना (दिल्ली) – ७४ स्ट्रोक्स.
१२ वर्षांखालील मुले – १८ होल्स – श्लोक जैन (अमेरिका) – ७७ स्ट्रोक्स.
१३ ते १४ वर्षांखालील मुले – १८ होल्स – अंशूल कबथियाल (दिल्ली) – ७१ स्ट्रोक्स, सुदय छालू (पुणे) – ७५ स्ट्रोक्स, रक्षिक बासू (कोलकाता) – ७७ स्ट्रोक्स.

यूएस किड्स गोल्फ इंडिया टूरचे २०१८-१९चे वेळापत्रक

१. ७ डिसेंबर २०१८ – दिल्ली – एनसीआर क्लासिक गोल्फ अँड कंट्री क्लब
२. ३ जानेवारी २०१९ – कोलकाता – टॉलीगंज क्लब
३. ९ जानेवारी २०१९ – बेंगळुरू – एगलटोन गोल्फ रिसॉर्ट
४. १२ जानेवारी २०१९ – हैदराबाद – बोल्डर हिल्स गोल्फ अँड कंट्री क्लब
५. १८ जानेवारी २०१९ – दिल्ली –  एनसीआर क्लासिक गोल्फ अँड कंट्री क्लब
६. २३ जानेवारी २०१९ – पुणे – पूना क्लब गोल्फ कोर्स
७. २८ जानेवारी २०१९ – चंडिगड – चंडिगड गोल्फ क्लब
८. ३१ जानेवारी २०१९ – दिल्ली – एनसीआर क्लासिक गोल्फ अँड कंट्री क्लब

यूएस किड्स गोल्फ स्पर्धेविषयी

आपल्या वयोगटानुसार ५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींना गोल्फचा आनंद घेण्यासाठी यूएस किड्स गोल्फ टूर एक व्यासपीठ मिळवून देते. यामुळे या खेळाडूंना स्पर्धात्मक गोल्फ खेळण्याचा आनंद तर मिळतोच, शिवाय चॅम्पियनशिप स्पर्धेच्या सहभागीसाठी एक दजार्ही प्राप्त होतो. प्रत्येक गटातील अव्वल पाच गोल्फर्सना चॅम्पियनशिप स्तराच्या स्पधेर्साठी आमंत्रित केले जाते. त्याचबरोबर नवे मित्रही जुळले जातात आणि नवा अनुभवही खेळाडूंना मिळतो.