असे होणार यूएस ओपनचे उपांत्य फेरीचे सामने !

आज अमेरिकन ओपनचा १०वा दिवस असून रविवारी पुरुष एकेरीची अंतिम फेरी होणार आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी माघार घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने तरुण, नव्या दमाच्या खेळाडूंना नाव कमावण्यासाठी ही ग्रँडस्लॅम स्पर्धा एक चांगलं व्यासपीठ आहे.

आज पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतून महान टेनिसपटू रॉजर फेडरर बाहेर पडला. त्याबरॊबर उपांत्यफेरीत ४ पैकी राफेल नदाल हा एकमेव असा खेळाडू आहे जो क्रमवारीत पहिल्या १० खेळाडूंमध्ये आहे. महिला एकेरीमध्येही व्हीनस विलियम्स ही पहिल्या १० मानांकन मिळालेल्या खेळाडूंपैकी एकमेव खेळाडू आहे.

उपांत्य फेरी

पुरुष एकेरी:
१. राफेल नदाल विरुद्ध डेल पोट्रो
२. केविन अँडरसन विरुद्ध पाब्लो कॅर्ररेनो बूस्ट

महिला एकेरी:
१.कोको वनदेवेघे विरुद्ध मॅडिसन कीज
२.व्हीनस विल्यम्स विरुद्ध स्लॉणे स्टीफन्स

मिश्र दुहेरी:
१. मार्टिना हिंगीस आणि जॅमी मरे विरुद्ध कोको वनदेवेघे आणि होरिया तेचौ
२. होवू चिंग चॅन आणि मायकल व्हीनस विरुद्ध अनास्तातसॆ रोडिओनोवा आणि ऑलिव्हर माराच

पुरुष दुहेरी:
१.हेन्री काँटिनें आणि जॉन पिर्स विरुद्ध जीन जुलिएन रॉजर आणि होरिया तेचौ
२. फेलिसिनो लोपेझ आणि मार्क लोपेझ विरुद्ध बॉब ब्रायन आणि माइक ब्रायन